शंकरराव मोहिते-पाटील यांच्या कार्याचा आदर्श राज्याचा लौकीक वाढविणारा - सुरेश प्रभू

By Admin | Updated: January 14, 2017 17:21 IST2017-01-14T17:21:25+5:302017-01-14T17:21:25+5:30

कारखाना, शैक्षणिक संस्था, बँका, पतसंस्था त्यांनी उभ्या करून सर्वसामान्यांच्या जीवनात आर्थिक क्रांती घडवून आणली.

Shankarrao Mohite-Patil's work for the development of the state - Suresh Prabhu | शंकरराव मोहिते-पाटील यांच्या कार्याचा आदर्श राज्याचा लौकीक वाढविणारा - सुरेश प्रभू

शंकरराव मोहिते-पाटील यांच्या कार्याचा आदर्श राज्याचा लौकीक वाढविणारा - सुरेश प्रभू

style="text-align: justify;">ऑनलाइन लोकमत
सोलापूर, दि. 14 - सहकारमहर्षी कै़ शंकरराव मोहिते-पाटील यांनी सहकार क्षेत्रात नावलौकीक कार्य केले आहे.   कारखाना, शैक्षणिक संस्था, बँका, पतसंस्था त्यांनी उभ्या करून सर्वसामान्यांच्या जीवनात आर्थिक क्रांती घडवून आणली देशात एकच पक्ष असताना अपक्ष म्हणून शंकरराव मोहिते-पाटील निवडून आले होते. लोकांचा विश्वास हाच आपल्या जीवनातील महत्वाचा पैलू आहे. तो शंकरराव मोहिते-पाटील यांनी जपला़ रेल्वे विभागाशी संबंधित अनेक प्रश्न प्रलंबित आहेत त्या लवकरच पूर्ण करून सोलापूर जिल्ह्याच्या वैभवात भर पाडू  असे मत रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी व्यक्त केले.
अकलूज (ता माळशिरस) येथील विजयसिंह मोहिते-पाटील क्रीडा संकुलावर राज्याला सहकाराच्या माध्यमातून समृद्धीची दिशा देणारे सहकार महर्षी शंकरराव मोहिते-पाटील यांच्या जन्मशताब्दी महोत्सवी वर्ष शुभारंभानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर  विधान परिषदेचे रामराजे निंबाळकर, सहकारमंत्री सुभाष देशमुख, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, पतंगराव कदम, खा़ छत्रपती शंभुराजे, माजी मंत्री विजयसिंह मोहिते-पाटील, रणजितसिंह मोहिते-पाटील, धवलसिंह मोहिते-पाटील, आ़ सिध्दाराम म्हेत्रे, आ़ भारत भालके, माजीमंत्री लक्ष्मणराव ढोबळे, माजी आमदार विश्वनाथ चाकोते, प्रकाश यलगुलवार, जिपचे माजी अध्यक्ष बळीराम साठे, कल्याणराव काळे, माजी आमदार दिपक साळुंखे-पाटील यांच्यासह राज्यातील दिग्गज नेते उपस्थित होते. 
अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत सहकाराच्या माध्यमातून समाजक्रांती, हरितक्रांती, धवलक्रांती करणारे सहकार महर्षी शंकरराव मोहिते-पाटील यांच्या जयंतीचे आज १०० वे वर्ष सुरु होत आहे. सहकार महर्र्षींच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास घडविणाºया सहकार चळवळीचा महामेरु असलेले स.म.कै.शंकरराव मोहिते-पाटील यांच्या कायार्ची दखल घेऊन महाराष्ट्र शासनाने १४ जानेवारी २०१७ ते १४ जानेवारी २०१८ या वर्षात संपूर्ण महाराष्ट्रभर जयंती साजरी करण्याचे ठरविले आहे.
यावेळी बोलताना विधान परिषदेचे रामराजे निंबाळकर म्हणाले की, आताच्या परीला सहकार खात्याचे काम चांगले आहे़ मात्र अजुनही सहकार खात्याकडून खुप अपेक्षा आहेत. बँका आहेत कर्ज मिळतात. पण चांगले शिक्षण देणाºया संस्था तालुकास्तरावर आल्या पाहिजेत़ एखादा साखर कारखाना बंद पडला तर तो त्वरीत सुरू करण्यासाठी सहकार खात्याने पाठबळ द्यायला हवे़ १९३० साली सर्वे झालेल्या रेल्वेमागार्ला त्वरीत मंजूरी मिळावी अशी अपेक्षा आहे.
यावेळी बोलताना सहकारमंत्री सुभाष देशमुख म्हणाले की, मी खुप भाग्यवान समजतो की मी राज्याचा सहकारमंत्री आहे़ रेल्वेमंत्र्यांनी सोलापूरहुन जाणाºया प्रत्येक रेल्वे गाड्यांना शेतक-यांसाठी एक विशेष डबा जोडावा. जेणेकरून सोलापूर जिल्ह्यात तयार होणा-या शेतक-यांच्या माल मुंबई सारख्या मोठया बाजारपेठांमध्ये पोहोचले जेणेकरून त्या शेतकºयांना जास्तीचा भाव ही मिळेल. अकलूजसारखाच मला राज्याचा विकास करायचा आहे, राज्यात सहकार खाते आदर्श करेन.
यावेळी बोलताना खा़ छत्रपती संभाजीराजे म्हणाले की,  राज्याच्या सहकार खात्याने सहकारमहर्षी शंकरराव मोहिते-पाटील यांच्या आदर्श घेत कार्य केले तर सहकार खाते मोठे होईल, मी येथे खासदार म्हणून न येता मोहिते-पाटील व आमचे कौटुंबिक संबंध आहेत़
यावेळी बोलताना माजी मंत्री पतंगराव कदम म्हणाले की, सहकारमहर्षी कै़ शंकरराव मोहिते-पाटील हे जिद्दी नेते होते़ सर्वसामान्यांना न्याय देण्याचे काम त्यांच्या कारकीर्दीत झाले़ राज्य सरकारने जन्मशताब्दी वर्ष साजरे करण्याचा निर्णय घेतला त्याबद्दल शासनाचे आभार, चांगले काम करणाºयांना साथ तर दिलीच पाहिजे. शंकरराव मोहिते-पाटील यांचे कार्य राज्याला आदर्श असे होते असेही त्यांनी सांगितले. या कार्यक्रमास राज्यातील दिग्गज नेत्यांबरोबर जिल्ह्यातील सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी हजर होते.

Web Title: Shankarrao Mohite-Patil's work for the development of the state - Suresh Prabhu

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.