शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

सोलापुरात शक्तीदेवीचा आजपासून जागर; दुपारी १.३६ पर्यंत घटस्थापनेचा मुहूर्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2018 11:55 IST

सोलापूर : शक्तीदेवीच्या नवरात्र महोत्सवास  आज बुधवार, दि. १० आॅक्टोबरपासून प्रारंभ होत असून, शक्तीदेवीचा जागर करण्यासाठी सोलापूरकर भाविकांची तयारी पूर्ण झाली आहे. शहरातील ४०६ सार्वजनिक नवरात्र मंडळांच्या वतीने प्रतिष्ठापना करण्यात येणार असून, २२१ मंडळे स्वतंत्र मिरवणुका काढणार आहेत. दरम्यान, घटस्थापनेसाठी पहाटे ५ वाजल्यापासून दुपारी १.३६ वाजेपर्यंतचा मुहूर्त आहे, असे पंचांगकर्ते ...

ठळक मुद्देविजयादशमी अर्थात दसरा सण १८ आॅक्टोबर रोजी सोलापूरची आराध्य देवता रूपाभवानी मातेच्या मंदिरात घटस्थापनेची तयारी पूर्णशक्तीदेवीचा जागर करण्यासाठी सोलापूरकर भाविकांची तयारी

सोलापूर : शक्तीदेवीच्या नवरात्र महोत्सवास  आज बुधवार, दि. १० आॅक्टोबरपासून प्रारंभ होत असून, शक्तीदेवीचा जागर करण्यासाठी सोलापूरकर भाविकांची तयारी पूर्ण झाली आहे. शहरातील ४०६ सार्वजनिक नवरात्र मंडळांच्या वतीने प्रतिष्ठापना करण्यात येणार असून, २२१ मंडळे स्वतंत्र मिरवणुका काढणार आहेत. दरम्यान, घटस्थापनेसाठी पहाटे ५ वाजल्यापासून दुपारी १.३६ वाजेपर्यंतचा मुहूर्त आहे, असे पंचांगकर्ते मोहन दाते यांनी सांगितले.

सोलापूरची आराध्य देवता रूपाभवानी मातेच्या मंदिरात घटस्थापनेची तयारी पूर्ण झाली असून, सकाळी ८ वाजता पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्या हस्ते घटस्थापना होणार आहे. पूर्व भागातील महालक्ष्मी मंदिरात सकाळी सात वाजता घटस्थापना होणार असल्याचे सांगण्यात आले. याशिवाय हिंगुलांबिका, कालिका, शाकंभरी देवीच्या मंदिरातही सकाळी लवकर घटस्थापना होणार आहे. रूपाभवानी मंदिरात नवरात्रोत्सव काळात दररोज पहाटेपासून भाविक दर्शनासाठी येतात. भाविकांच्या सुविधेसाठी ट्रस्ट आणि भक्तमंडळाने तयारी केली आहे. 

नवरात्रानिमित्त घरोघरी घटांची स्थापना केली जाते. घटाच्या साहित्याच्या खरेदीसाठी लक्ष्मी मंडई, हद्दवाढ भागातील आसरा, विजापूर रोड परिसरात मोठी गर्दी होती. दरम्यान, पंचांगकर्ते मोहन दाते यांनी सांगितले की, सर्वसाधारणपणे घटस्थापनेपासून दसºयापर्यंत ९ दिवस किंवा १० दिवसांचे अंतर असते. तिथीच्या क्षयवृद्धीमुळे असा फरक असतो. या वर्षी घटस्थापनेपासून ९ व्या दिवशी दसरा आहे. यापूर्वी अनेक वेळेस असे झालेले आहे. साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेला दसरा हा कितव्याही दिवशी आला तरी शुभच असतो, असेही ते म्हणाले.-दसºयाचा विजय मुहूर्तविजयादशमी अर्थात दसरा सण १८ आॅक्टोबर रोजी असून, साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेला दसरा हा दिवस अत्यंत शुभ मानला जातो. या दिवशी विजय मुहूर्तावर अनेक लोक आपल्या नवीन उपक्रमाचा आरंभ करतात. हा विजय मुहूर्त दुपारी २.२० ते ३.०७ या दरम्यान आहे. तत्पूर्वी अशौचामुळे ज्यांना १० आॅक्टोबर रोजी घटस्थापना करणे शक्य होणार नाही त्यांनी अशौच निवृत्तीनंतर (अशौच संपल्यावर) ११ आॅक्टोबर, १३ आॅक्टोबर, १६ आॅक्टोबर, १७ आॅक्टोबर यापैकी कोणत्याही दिवशी घटस्थापना करावी व १८ रोजी नवरात्रोत्थापन करावे, असे आवाहन दाते यांनी केले.

टॅग्स :SolapurसोलापूरNavratriनवरात्रीDasaraदसरा