शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
2
'पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना आधीच पकडले होते, काल मारले'; काँग्रेस नेत्याने ऑपरेशन महादेववर व्यक्त केला संशय
3
UPI व्यवहारांवर नवे निर्बंध; १ ऑगस्टपासून ‘डिजिटल शिस्त’ लागू, तुमच्यावर काय परिणाम होणार
4
मनसे-उद्धवसेना युती झाल्यास शिंदेंकडे गेलेल्या माजी नगरसेवकांच्या जागांवर दावा कुणाचा राहणार?
5
भारताची नक्कल करायला गेला अन् पाकिस्तान तोंडावर पडला! १३ चाचण्या करूनही क्षेपणास्त्र अयशस्वी
6
हलगर्जीपणाचा कळस! डॉक्टर काढत होते झोपा; मिळाले नाही उपचार, रुग्णाचा तडफडून मृत्यू
7
माजी कमांडो मारला जाताच पाकिस्तान तडफडू लागला; तीन दहशतवाद्यांना 'निष्पाप पाकिस्तानी' म्हणू लागला...
8
बँकांमध्ये ₹६७,००० कोटींची रक्कम पडून; कोणीही दावा केला नाही, सर्वाधिक पैसे कुठे?
9
माझ्या बाप्पाचं नाव मी शाहरुख ठेवलंय, तर सिद्धिविनायकाचं..., हर्षदा खानविलकर असं का म्हणाल्या?
10
पहलगामचा बदला घेतला; २६ पर्यटकांची हत्या करणारे तीन दहशतवादी ठार, अमित शाहांची माहिती
11
PF पेन्शन वाढीवर सरकारचा 'यू-टर्न'? ७,५०० रुपये पेन्शन मिळणार की नाही? संसदेत केलं स्पष्ट
12
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
13
पत्नीचा विरह सहन होईना! घटस्फोटानंतर पतीनं जेवण सोडलं; ३० दिवस फक्त बिअर पिऊन जगला, मग जे घडले...
14
'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती
15
Nag Panchami 2025: नागपंचमीला उघडतो मंदिराचा तिसरा दरवाजा; काय दडले आहे तिथे?
16
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
17
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
18
नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा खरंच रद्द झाली का? काय आहे या दाव्याचं सत्य? जाणून घ्या...
19
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी
20
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले

सोलापुरातील श्राविक संस्थेच्या अध्यक्षा विद्युलताभून शहा यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2020 18:30 IST

कुमठे येथील जैन समाज व भारतीय जैन संघटनेच्यावतीने श्रद्धांजली वाहण्यात आली.

सोलापूर : सोलापूर श्राविका संस्था नगर सोलापूरच्या  अध्यक्षा अ ब्र. विद्युलता भून हिराचंद शहा (वय ९७) यांचे बुधवार २७ मे २०२० रोजी निधन झाले. दरम्यान,  क्षेत्र १००८ श्री चंद्रप्रभू दिगम्बर जैन मंदिर कुमठे येथील जैन समाज व भारतीय जैन संघटनेच्यावतीने श्रद्धांजली वाहण्यात आली.

विद्युलता शहा यांनी आजन्म ब्रह्मचर्य व्रताचा स्वीकार करून स्व.पद्मश्री पंडिता सुमतीबाई शहा यांच्या मार्गदर्शनाखाली उमाबाई श्राविकेच्या मुख्याध्यापिका, प्राचार्य या पदापासून संस्थेच्या अध्यक्षपदापर्यंत कार्यभार सांभाळला. त्या जैन शास्त्रानुसार सप्तम प्रतिमाधारी होत्या.  संस्कृत पंडिता, जैन तत्त्वज्ञानाच्या अभ्यासिका, साहित्यिक, महाविदुषी होत्या. त्यांना महाकवी कालिदास संस्कृत पुरस्कार, महिलारत्न पुरस्कार, साहित्य क्षेत्रात सन्मानाने गौरविले होते. त्यांनी आयुष्यभर महिलाच्या कल्याणासाठी व्रतस्थपणे कार्य केले. विधवा, परित्यक्ता, अनाथ महिलांना त्यांनी स्वावलंबी बनवले. आपल्या मासिक वेतनातून त्यांनी सामाजिक, शैक्षणिक संस्थांच्या समाजोद्वाराच्या कार्यासाठी निधी दिला आहे.

श्राविका संस्थेचे सचिव हर्षवदन शहा, शिरीष शहा, गिरीश शहा, डॉ.महावीर शास्त्री, विश्वस्त अतुल शहा, अंजली शहा, डॉ.मेहता, सुकुमार मोहोळे, मुख्याध्यापिका राखी देशमाने यांनी श्रद्धांजली समर्पित केली.

कुमठे जैन समाजाच्या वतीने श्रद्धांजलीश्री चंद्रप्रभू दिगंबर जैन मंदिर कुमठे येथे जैन समाजाच्या वतीने व भारतीय जैन संघटनेच्या वतीने श्रद्धांजली वाहण्यात आली. मंदिराच्या जीर्णोद्धार कामामध्ये विद्युलता भुन यांनी योगदान असून त्यांनी जीर्णोद्धारासाठी खुप प्रयत्न केले, असे अध्यक्ष श्याम पाटील यांनी सांगितले. यावेळी वालचंद पाटील, नितीन कासार, संजय पानपट आदींनी श्रद्धांजली वाहिली.जैन कासार विकास प्रतिष्ठानच्या वतीनेही त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी अध्यक्ष कांतीलाल नळे, संजय मधुकर कंदले, विनायक टोणगे, हुकुमचंद हेसे, माणिक व्यवहारे उपस्थित होते.

कुमठे येथील अतिशय क्षेत्र १००८ चंद्रप्रभू जैन मंदिर जीर्णोद्धार कामांमध्ये विद्युलता भुंन यांनी मोठे योगदान दिले असून त्यांच्या प्रयत्नातूनच मंदिराच्या जिर्णोद्धारच्या कामाला गती मिळाली अशी प्रतिक्रिया मंदिर समितीचे अध्यक्ष शाम पाटील यांनी व्यक्त केली. यावेळी मंदिर समितीचे सचिव वालचंद पाटील, नितीन कासार, संजय पानपट, अक्षय शहा, वैभव पाटील, महावीर पानपट यांचाही सहभाग होता. 

टॅग्स :Solapurसोलापूर