सात हजाराची वाळू अन्‌ साडेसहा लाखाचा ट्रक्टर जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2021 04:20 IST2021-03-28T04:20:57+5:302021-03-28T04:20:57+5:30

पोलीस सूत्रांनुसार ट्रॅक्टर चालक सिद्धाराम जाधव (रा. मिरजगी) हा शुक्रवारी सकाळी साडेअकरा वाजता भरदिवसा फत्तेसिंह चौकामधून एका ट्रॅक्टरमध्ये एक ...

Seven thousand sand and six and a half lakh tractors seized | सात हजाराची वाळू अन्‌ साडेसहा लाखाचा ट्रक्टर जप्त

सात हजाराची वाळू अन्‌ साडेसहा लाखाचा ट्रक्टर जप्त

पोलीस सूत्रांनुसार ट्रॅक्टर चालक सिद्धाराम जाधव (रा. मिरजगी) हा शुक्रवारी सकाळी साडेअकरा वाजता भरदिवसा फत्तेसिंह चौकामधून एका ट्रॅक्टरमध्ये एक ब्रास वाळू घेऊन जात होता. त्यावेळी उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या पथकांनी पकडली. त्यामधून एक ब्रास वाळू व ट्रॅकर, ट्रॉली असे मिळून या घटनेत तब्बल ६ लाख ५७ हजार रुपयांचे मुद्देमाल जप्त केला. उत्तर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदला आहे. चालकाला तत्काळ अटक करून त्याच्या विरोधात कलम ३७९ चोरी गुन्हा नोंदला आहे.

शनिवारी सकाळी येथील न्यायाधीश एस. एन. गवळी यांच्यासमोर उभे केले असता, एका दिवसाची पोलीस कोठडी सुनावली. या घटनेत उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालयातील पोलीस अंमलदार के. व्ही. डोळे हे यांनी फिर्याद दिली आहे. याबाबत अक्कलकोट येथील उत्तर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदला असून, अधिक तपास अंमलदार वाय. डी. वानखेडे करीत आहेत.

----

Web Title: Seven thousand sand and six and a half lakh tractors seized