सायकल रायडिंगमध्ये सव्वाशे जणांचा सहभाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2021 04:15 IST2021-07-03T04:15:22+5:302021-07-03T04:15:22+5:30

पांडुरंग कारखान्याचे कार्यकारी संचालक डॉ. यशवंत कुलकर्णी यांच्या वाढदिवसानिमित्त ‘सायकल राईड’चे आयोजन केले होते. उद‌्घाटन डॉ. सुधीर पोफळे, आर. ...

Seven hundred people participate in bicycle riding | सायकल रायडिंगमध्ये सव्वाशे जणांचा सहभाग

सायकल रायडिंगमध्ये सव्वाशे जणांचा सहभाग

पांडुरंग कारखान्याचे कार्यकारी संचालक डॉ. यशवंत कुलकर्णी यांच्या वाढदिवसानिमित्त ‘सायकल राईड’चे आयोजन केले होते. उद‌्घाटन डॉ. सुधीर पोफळे, आर. बी. पाटील, अनंता कुलकर्णी, मारुती उपासे यांनी कै. सुधाकरपंत परिचारक व पांडुरंगाच्या प्रतिमेचे पूजन करून केले. फ्लॅग दाखवून सायकल राईडची सुरुवात केली. पांडुरंग कारखाना मेन गेट येथून थोरली चौकी, कॉलेज चौक, प्रतापसिंह चौक, विजयसिंह मोहिते-पाटील क्रीडा संकुल अकलूज तर परतीचा प्रवास महर्षी चौक, सदाभाऊ चौक, जुने एस. टी. स्टँड, टेंभुर्णी चौक, थोरली चौकी मार्गे पांडुरंग कारखाना गेट समोर सायकल राईड समाप्त झाली.

अकलूज रॉयल राईडचे अध्यक्ष धैर्यशील मोहिते-पाटील यांनी सायकल रायडर टीमला भेट देऊन मार्गदर्शन केले. यासाठी डॉ. सुधीर पोफळे, बी. एस. बाबर, राहुल साठे, राजू पवार, भूषण धाईंजे, ओंकार पवार, ज्ञानेश्वर खुळे, आबा इंगळे, जगदीश अग्निहोत्री, प्रवीण शिंदे, भारत जाधव, श्रीकृष्ण पुजारी, राजशेखर विभुते, श्रीकांत सहस्रबुद्धे, नागनाथ वाघमारे, बाहुबली वठारे, अजिम मुलाणी, बाहुबली हासुरे, अरविंद लोंढे, अशोक बिरलिंगे, रमेश माने, सिकंदर डांगे, प्रसाद सुमंत, प्रदीप गाडे, चंद्रकांत थिटे यांचे सहकार्य लाभले.

Web Title: Seven hundred people participate in bicycle riding