शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
4
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
5
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
6
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
7
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
8
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
9
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
10
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
11
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
12
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
13
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
14
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
15
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
16
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
17
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
18
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
19
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
20
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
Daily Top 2Weekly Top 5

सेव्हन हिल्स अपहार प्रकरणात ३९०० पानांचे दोषारोपपत्र 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2018 12:56 IST

कोट्यवधींची फसवणूक करणारी सेव्हन हिल्स कंपनी, सात अटकेत तर नऊ आरोपी फरार

ठळक मुद्देसोलापुरातील गुंतवणूकदारांची १.११ कोटींची फसवणूक३ हजार ९०० पानांचे दोषारोपपत्र न्यायालयात दाखल

सोलापूर : सोलापुरातील गुंतवणूकदारांची १.११ कोटींची फसवणूक केल्याप्रकरणी  सेव्हन हिल्स कंपनीविरुद्ध आर्थिक गुन्हे शाखेने ३ हजार ९०० पानांचे दोषारोपपत्र अतिरिक्त सत्र न्यायाधीश वाय. जी. देशमुख यांच्या न्यायालयात दाखल केले.

सेव्हन हिल्स रिअ‍ॅलिटिज प्रा. लि. कंपनीने सोलापूर शहरात मोबाईल गल्लीत २०१२ साली कार्यालय सुरु केले. सन २०१५ या कालावधीत कंपनीने पिग्मी योजना, दामदुप्पट योजना,मंथली इन्कम, सुवर्ण योजना अशा प्रकारच्या योजना तयार करुन त्यामध्ये १५०० पेक्षा जास्त नागरिकांनी गुंतवणूक केली. यात १ कोटी ११ लाखांची फसवणूक झाल्याबद्दल संतोष वसंतराव शिर्के यांनी फौजदार चावडी पोलीस ठाण्यात सेव्हन हिल्सचे संचालक,चेअरमन यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदला होता.

या गुन्ह्याची व्याप्ती पाहून हा गुन्हा आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला. पोलिसांनी या प्रकरणात सात आरोपींना अटक केली तर नऊ जण अद्यापही फरार आहेत.  या प्रकरणात ३८० जण साक्षीदार आहेत. आरोपीतर्फे अ‍ॅड. प्रशांत नवगिरे, सरकारतर्फे  जिल्हा सरकारी वकील संतोष न्हावकर तर मूळ फिर्यादीकडून अ‍ॅड. जयदीप माने काम पाहत आहेत.

अटकेत असलेले आरोपी असे- विशाल दत्तात्रय मोरे (वय ३२, निराळे वस्ती, सोलापूर), प्रसाद बाबासाहेब लाड (वय ४०,रा. डीमार्ट जवळ), एन. प्रसाद रेड्डी (वय ४०, रा. कर्नाटक),  व्ही. विजयकुमार (वय ३९,रा. कृष्णगिरी, तामिळनाडू), एकनाथ नामदेव ढगे (वय ४८,रा. विजापूर), नागराज रेड्डी , रघुवीर प्रेमसिंग नायक (वय ३४).

फरार असलेले आरोपी असे- जी़ नारायणप्पा गिडप्पा( रा. कर्नाटक), वाय. आर. मधुसूदन (रा.कृष्णगिरी कर्नाटक), रामचंद्र गुरप्पा सिक्कनपली(रा.मंडय्या कर्नाटक), टी. राजहै (रा. कर्नाटक), एन. प्रमिला (रा. कर्नाटक), पेनूकोंडा चंद्रशेखर अकुला (रा. आंधप्रदेश), दसप्पा हणमंतराजू (रा. कर्नाटक), वालमिकी नरसिंहम्हलू थिरुमलेश (रा. आंधप्रदेश) अशी फरार दाखविलेल्या आरोपींची नावे आहेत.

टॅग्स :SolapurसोलापूरCourtन्यायालयCrimeगुन्हाPoliceपोलिस