शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

सातारा, सांगली, पुण्याचे सेतू कार्यालय सुरू, मग साेलापूरचे बंद का? 

By राकेश कदम | Updated: April 7, 2023 18:28 IST

प्रणिती शिंदेंचा सवाल : जिल्हा प्रशासनाच्या भूमिकेवर केली टीका

राकेश कदम

सोलापूर : जिल्हाधिकारी कार्यालयातील सेतू सुविधा केंद्राची मुदत संपणार असल्याचे जिल्हा प्रशासनाला ज्ञात हाेते. तरीही नवी निविदा प्रक्रिया काढण्यात विलंब का झाला? सेतू सुविधा केंद्र तत्काळ सुरू करा, अशी मागणी काॅंग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांनी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्याकडे निवेदनाव्दारे केली.

 आमदार प्रणिती शिंदे कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात आहेत. यादरम्यान त्यांनी जिल्हाधिकारी शंभरकर यांना पत्र पाठविले. प्रणिती शिंदे म्हणाल्या, साेलापुरातील सेतू कार्यालय १ एप्रिल २०२३ पासून अचानक बंद केले. नवे शैक्षणिक वर्ष सुरू हाेण्यापूर्वी शहरातील बहुसंख्य विद्यार्थी व नागरीकांना सेतू सुविधा केंद्रातून दाखले काढण्याचा प्रयत्न करतात. हे कार्यालय बंद असल्यामुळे विद्यार्थी व नागरीक यांना अनेक अडचणी निर्माण होत आहेत.  सेतू कार्यालय सोडून इतर सुविधा केंद्रांमधून दाखले काढण्यासाठी अधिकचे पैसे घेण्याचा प्रकार मोठ्या प्रमाणात समोर येत आहे. सातारा, सांगली, पुणे या ठिकाणी सेतू कार्यालय सुरू आहेत. केवळ साेलापुरातील सेतू बंद ठेवण्यामागे काय उद्देश असा सवालही शिंदे यांनी उपस्थित केला.

तुम्ही गप्प का राहिलात ?

सेतू कार्यालयाची निविदा ३१ मार्च २०२३ रोजी संपणार असल्याचे जिल्हा प्रशासनाला ज्ञात हाेते. त्या आधी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून जुन्या कंत्राटदारास मुदतवाढ देणे अथवा नवीन टेंडर काढणे गरजेचे आहे. परंतु तसे झालेले नाही. सेतू कार्यालय सुरु करण्यासाठी विद्यार्थी व नागरीकांनी मला संपर्क साधून त्यांची व्यथा मांडली आहे.  इतर सुविधा केंद्रांमधून कशाप्रकारे अधिकचे पैसे घेतले जातात ही बाब निदर्शनास आणून दिली आहे. प्रशासनाने तत्काळ ताेडगा काढायला हवा

टॅग्स :SolapurसोलापूरPuneपुणे