सत्र न्यायाधीश डी.एस. मराठेंना दिली सक्तीची निवृत्ती
By Admin | Updated: September 3, 2014 00:45 IST2014-09-03T00:45:44+5:302014-09-03T00:45:44+5:30
सक्तीची निवृत्ती

सत्र न्यायाधीश डी.एस. मराठेंना दिली सक्तीची निवृत्ती
सोलापूर : तदर्थ जिल्हा व सत्र न्यायाधीश डी. एस. मराठे यांना मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार मंगळवारी सक्तीची निवृत्ती देण्यात आली. गेल्या महिन्यात पंढरपूरच्या अतिरिक्त सत्र न्यायाधीश स्मिता कडू यांना कार्यमुक्त करण्यात आले होते.
डी. एस. मराठे हे जून २०१२ मध्ये सोलापुरात रुजू झाले होते. तदर्थ जिल्हा व सत्र न्यायाधीश म्हणून ते कार्यरत होते. मंगळवारी दुपारी ३ ते साडेतीनच्या सुमारास त्यांना प्रमुख जिल्हा न्यायाधीश अश्विनकुमार देवरे यांनी आपल्या केबिनमध्ये बोलावून घेतले. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार त्यांनी मराठे यांना सक्तीची निवृत्ती घेण्यास सांगितले. सक्तीची निवृत्ती घेण्यामागील नेमके कारण समजू शकले नाही.