शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

सप्टेंबरच्या नुकसानीचे पंचनामे उरकले आॅक्टोबरच्या पावसाने पुन्हा झोडपले !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2020 12:46 IST

२५ हजार ५१५ हेक्टरवरील पिकांचे नुकसान: खरिपाचे नुकसान तर रब्बीची पिके धोक्यात

ठळक मुद्देकाढणीला आलेल्या उडीद, मूग, सूर्यफूल, मका, बाजरी आणि कांद्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान प्राथमिक अंदाजानुसार ११ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचे कृषी विभागाने म्हटलेआकडेवारी हाती आल्यावर २५ हजार ५१५ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचे दिसून आले

सोलापूर :  सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीने शेतीच्या झालेल्या नुकसानीचे पंचनामे बुधवारी पूर्ण होत असतानाच वादळी पावसाने झोडपल्याने हाती आलेल्या खरीप पिकांचे नुकसान तर पेरणी झालेली रब्बीची पीके धोक्यात आली आहेत. अशा दुहेरी संकटात जिल्ह्यातील शेतकरी सापडला आहे. 

सप्टेंबरच्या दुसºया आठवड्यात जिल्ह्याला पावसाने झोडपले. यामध्ये काढणीला आलेल्या उडीद, मूग, सूर्यफूल, मका, बाजरी आणि कांद्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. नुकसानीचे पंचनामे महसूल व कृषी खात्यामार्फत  सुरू करण्यात आले होते. प्राथमिक अंदाजानुसार ११ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचे कृषी विभागाने म्हटले होते. पण बुधवारी सर्व तालुक्यातून आकडेवारी हाती आल्यावर २५ हजार ५१५ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचे दिसून आले आहे. 

खळ्यात कुजल्या राशीसप्टेंबरमधील पिकांच्या नुकसानीची आकडेवारी जुळवत असतानाच मंगळवारी रात्रीपासून पुन्हा जिल्ह्याला पावसाने झोडपले. जिल्ह्यात संततधार कायम असून, सप्टेंबर महिन्यापेक्षा या पावसाने मोठे नुकसान झाले आहे. संततधार पावसाने काढणीला आलेले सोयाबीन शेतातच राहिले तर काढलेले धान्य खळ्यात कुजले आहे. 

शेततळी रिकामी करासंततधार पावसाने जिल्ह्यातील अनेक तलाव भरले आहेत. त्यामुळे सांडवे मोकळे करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. पण अनेक शेतक?्यांच्या शेतात शेततळी आहेत. सततच्या पावसाने या शेततळ्यांना धोका असून, यातील पाणी शेतकºयांनी रिकामे करावे, असे आवाहन कृषी विभागातर्फे करण्यात आले आहे.

कांदा, ऊस भुईसपाटअशीच परिस्थिती मका, भुईमुगाची झाली आहे. गेल्या आठवड्यात पावसाने उसंत दिल्यावर ज्वारीची पेरणी झाली आहे. ज्वारीच्या उगवणीला फटका बसणार आहे. याचबरोबर शेतात पाणी साचून राहिल्याने कांदा व ऊस आडवा झाला आहे. तूर, द्राक्ष, डाळिंब, केळी, बोर, सीताफळ, भाजीपाल्यांनाही फटका बसला आहे. 

पुन्हा पंचनामे होणारसप्टेंबर महिन्यात झालेल्या नुकसानीचे पंचनामे पूर्ण झाले आहेत. ही आकडेवारी शासनाला पाठविण्यात येणार आहे. आता मंगळवारी रात्रीपासून सुरू झालेल्या पावसाने मोठा फटका बसला आहे. पावसाच्या विश्रांतीनंतर पंचनामे करण्यात येतील अशी माहिती कृषी अधिकारी रवींद्र माने यांनी दिली. 

टॅग्स :SolapurसोलापूरRainपाऊसagricultureशेतीFarmerशेतकरीfloodपूर