बेकायदा दारू विक्रीसाठी नेणारे वाहन पकडून सात लाखांचा मुद्देमाल जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2021 04:23 IST2021-05-21T04:23:33+5:302021-05-21T04:23:33+5:30
टेंभुर्णी - अहमदनगर मार्गावर पेट्रोलिंग करत असताना गुरुवारी पहाटे नालबंद मंगल कार्यालयाजवळ एका गाडीत दारूचे बॉक्स पोलिसांना दिसले. करमाळा ...

बेकायदा दारू विक्रीसाठी नेणारे वाहन पकडून सात लाखांचा मुद्देमाल जप्त
टेंभुर्णी - अहमदनगर मार्गावर पेट्रोलिंग करत असताना गुरुवारी पहाटे नालबंद मंगल कार्यालयाजवळ एका गाडीत दारूचे बॉक्स पोलिसांना दिसले. करमाळा पोलिसांना एकजण एका पांढऱ्या गाडीमधून दारूच्या बाटल्या घेऊन जात आहे, अशी माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी गाडी तपासली तेव्हा नीलेश हंगे हा दारूचे बॉक्स घेऊन जाताना सापडला. त्याच्यावर गुन्हा दाखल करून गाडी व दारू असा सात लाख नऊ हजार ७२८ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
करमाळा पोलीस ठाण्याचे हवालदार देवकर, पोलीस ढवळे, लोंढे हे पेट्रोलिंग करत होते. तेव्हा त्यांना खबऱ्यामार्फत माहिती मिळाली होती. त्यानुसार हंगे यांच्याकडील १८० मिलीच्या तीन हजार २६४ दारू बाटल्या व चारचाकी गाडी जप्त केली. पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अप्पर पोलीस अधीक्षक झेंडे, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. विशाल हिरे, पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांच्या मार्गदर्शनाखाली हवलादार संतोष देवकर तपास करीत आहेत.
२०करमाळा-पोलीस ॲक्शन
करमाळा पोलिसांनी जप्त केलेले बेकायदेशीर दारूचे बाॅक्स.