उंदरगावच्या मनोहरमामाची प्राॅपर्टी जप्त करून बँक खाती गोठवा, शिवसेनेची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2021 04:24 IST2021-09-11T04:24:01+5:302021-09-11T04:24:01+5:30

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांना पाठवलेल्या निवेदनात म्हटले आहे की, नरबळीसारख्या प्रवृत्तीला खतपाणी घालणाऱ्या व महिलांवर ...

Seize the property of Manoharmama of Undargaon and freeze bank accounts, demand of Shiv Sena | उंदरगावच्या मनोहरमामाची प्राॅपर्टी जप्त करून बँक खाती गोठवा, शिवसेनेची मागणी

उंदरगावच्या मनोहरमामाची प्राॅपर्टी जप्त करून बँक खाती गोठवा, शिवसेनेची मागणी

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांना पाठवलेल्या निवेदनात म्हटले आहे की, नरबळीसारख्या प्रवृत्तीला खतपाणी घालणाऱ्या व महिलांवर बलात्कार करणाऱ्या मन्या ऊर्फ मनोहर भोसलेने अब्जावधी रुपयांची संपत्ती कमावली आहे. ही संपत्ती इतरांच्या नावावर ट्रान्सफर करण्याच्या प्रयत्नात मनोहर भोसले आहे. यामुळे तत्काळ शासनाने विशेष बाब म्हणून त्याची सर्व प्रॉपर्टी व बँक खाती जप्त करावीत.

मनोहर भोसले भविष्य सांगायचा मग त्याच्या भविष्यात पुढे काय लिहिले आहे हे त्याला कळले नाही. केवळ पंधरा दिवसांत मनोहर भोसले याचा बुरखा फाटला गेला. ज्याला स्वतःचे भविष्य माहीत नाही. तो दुसऱ्याचे भविष्य काय सांगणार. समाजात अशी प्रवृत्ती वाढत असून याला जरब बसण्यासाठी कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.

----

Web Title: Seize the property of Manoharmama of Undargaon and freeze bank accounts, demand of Shiv Sena