बाबूराव पाटील महाविद्यालयात सीड बॉल उपक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2021 04:15 IST2021-07-09T04:15:32+5:302021-07-09T04:15:32+5:30
अनगर : बाबूराव पाटील कला व विज्ञान महाविद्यालय, अनगर येथे इनोव्हेटिव्ह आणि बेस्ट प्रॅक्टिसेस या उपक्रमांतर्गत आयक्यूएसी, ...

बाबूराव पाटील महाविद्यालयात सीड बॉल उपक्रम
अनगर : बाबूराव पाटील कला व विज्ञान महाविद्यालय, अनगर येथे इनोव्हेटिव्ह आणि बेस्ट प्रॅक्टिसेस या उपक्रमांतर्गत आयक्यूएसी, राष्ट्रीय सेवा योजना आणि वनस्पतीशास्त्र विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने सीड बॉल उपक्रम राबविण्यात आला.
विद्यार्थ्यांनी झाडांच्या बिया वर्षभर गोळा करून वनस्पतीशास्त्र विभागात जमा केल्या. त्या वाळवून ठेवल्या होत्या. जमा केलेल्या बियांचे जून महिन्यामध्ये माती आणि शेणखत यांच्या मिश्रणात वाळवलेल्या बिया टाकून त्यांच्यापासून सीड बॉल बनवले गेले. त्यानंतर मोहोळ - अनगर रोडवर कुरणवाडी येथील जंगलात या उपक्रमाचा शुभारंभ बारामती येथील इकोशास्र या संस्थेचे प्रा. शुभम ठोंबरे, प्रा अमेय महाडिक आणि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. चंद्रकांत सूर्यवंशी यांच्या हस्ते झाला. प्रा.डॉ. मच्छिंद्र राऊत, प्रा. डॉ. रवींद्र देशमुख आणि प्रा. डॉ. तुषार रोडगे यांनी परिश्रम घेतले.
-----
फोटाे : ०८ अनगर
बाबुराव पाटील महाविद्यालयात सीड बॉल उपक्रम राबविताना प्रा. शुभम ठोंबरे, प्रा अमेय महाडिक, प्राचार्य डॉ. चंद्रकांत सूर्यवंशी