शहरं
Join us  
Trending Stories
1
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
2
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
3
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
4
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
5
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
6
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
7
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
8
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
9
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
10
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
11
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
12
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
13
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
14
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
15
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
16
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
17
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
18
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
19
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  

अंगणात गुपचूप लग्न पडलं महागात; नवरीचा भाऊ निघाला कोरोना पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2020 12:41 IST

अक्कलकोट तालुक्यातील प्रकार; लग्नासाठी आलेले चाळीस जण क्वारंटाईन

ठळक मुद्देहंजगी येथील दयानंद काशिनाथ पाटील यांनी आपल्या राहत्या घरी रविवारी ३१ मेच्या भल्या पहाटे अंगणात शेकडो लोकांच्या उपस्थितीत लग्नकार्य उरकलेहंजगी गावचा नवरा तर कर्नाटकातील कपनिवर्गी (ता. इंडी, जिल्हा विजयपूर) येथील नवरी यांचे काही महिन्यांपूर्वी लग्न ठरले होतेआतापर्यंत सुमारे ४० लोकांना क्वारंटाईन केले आहे. संबंधितावर तपासाअंती कायदेशीर कारवाई होणार

अक्कलकोट : लॉकडाऊन असतानाही प्रशासनाची परवानगी न घेता एका कुटुंबाने राहत्या घरासमोरच्या अंगणात गुपचूप लग्न उरकले. त्यामध्ये कर्नाटकातून आलेल्या पाहुण्यांपैकी नवरीचा भाऊ कोरोना पॉझिटिव्ह निघाला. यामुळे तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. मंगळवारी सायंकाळपर्यंत या प्रकरणातील तब्बल ४० जणांना प्रशासनाकडून क्वारंटाईन करण्यात आले आहे.

हंजगी येथील दयानंद काशिनाथ पाटील यांनी आपल्या राहत्या घरी रविवारी ३१ मेच्या भल्या पहाटे अंगणात शेकडो लोकांच्या उपस्थितीत लग्नकार्य उरकले. हंजगी गावचा नवरा तर कर्नाटकातील कपनिवर्गी (ता. इंडी, जिल्हा विजयपूर) येथील नवरी यांचे काही महिन्यांपूर्वी लग्न ठरले होते. मात्र, तीन महिन्यांपासून लॉकडाऊनमध्ये सतत वाढ होत असल्याने अखेर घरच्या घरी लग्नकार्य उरकण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार रविवारी पहाटे दोन्ही बाजूची पाहुणे मंडळी एकत्रित आली. पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास अक्षता टाकून पाहुणे जेवणावळी करून निघून गेले, अशी चर्चा आहे. याची गावातील कोरोना नियंत्रण समितीसह कोणालाच माहिती नाही. या लग्नाला हंजगी परिसरातील जेऊर, दोड्याळ यासह अनेक गावच्या पै-पाहुण्यांनी हजेरी लावली होती. या लग्नाला उपस्थित राहिलेल्या कर्नाटकातील नवरीच्या भावाचा कोरोना पॉझिटिव्ह अहवाल आल्याची माहिती अक्कलकोट तहसील प्रशासनाला मिळाली. यामुळे दोन दिवसांत ४० हून अधिक जणांना तहसीलदार अंजली मरोड यांच्या आदेशानुसार क्वारंटाईन करण्यात आलेले आहे.

भाऊ आला होता कर्नाटकातून..- नवरीचे आई, वडील मुंबई येथे वास्तव्यास होते. गेल्या काही दिवसांपूर्वी कोरोनामुळे ते कर्नाटकातील कपनिवर्गी (ता. इंडी, जिल्हा विजयपूर) या आपल्या मूळगावाकडे राहण्यास आले होते. ते रेड झोनमधून आल्याने त्या कुटुंबातील नवरीसह सर्वांना स्थानिक कोरोना नियंत्रण समितीने क्वारंटाईन केले होते. त्या सर्वांचे स्वॅब घेण्यात आले होते. त्यापैकी नवरीसह काही जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले होते. आई, वडील व भावाचे रिपोर्ट येणे बाकी होते. त्याचा विचार न करता होम क्वारंटाईन असतानाही ते हंजगी येथे लग्नाला आले होते. दरम्यान, सोमवारी इंडी येथील प्रशासनाकडून अक्कलकोटच्या तहसीलदारांना मोबाईलद्वारे नवरीचा भाऊ पॉझिटिव्ह आढळल्याचे सांगण्यात आले. तेव्हापासून अलर्ट होऊन अक्कलकोट प्रशासनाने कार्यवाहीस प्रारंभ केला आहे. 

हंजगीत विनापरवाना  एका जोडप्याचे लग्न करण्यात आले आहे. त्या ठिकाणी उपस्थितांपैकी कर्नाटकातून आलेल्यांमध्ये एका कोरोना पॉझिटिव्ह व्यक्तीचा समावेश होता. म्हणून आतापर्यंत सुमारे ४० लोकांना क्वारंटाईन केले आहे. संबंधितावर तपासाअंती कायदेशीर कारवाई होणार आहे.- तुकाराम राठोड, सपोनि, दक्षिण पोलीस ठाणे,

टॅग्स :Solapurसोलापूरcorona virusकोरोना वायरस बातम्याKarnatakकर्नाटकmarriageलग्न