नरखेड येथे ४० ज्येष्ठांना कोविशिल्ड लसीचा दुसरा डोस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2021 04:20 IST2021-05-15T04:20:38+5:302021-05-15T04:20:38+5:30

आरोग्याधिकारी डॉ. किरण बंडगर यांनी दुसरा डोस घेणाऱ्या ज्येष्ठ नाागरिकांना ४० कोविशिल्ड लसी उपलब्ध करून दिल्या. ...

Second dose of Covishield vaccine for 40 seniors at Narkhed | नरखेड येथे ४० ज्येष्ठांना कोविशिल्ड लसीचा दुसरा डोस

नरखेड येथे ४० ज्येष्ठांना कोविशिल्ड लसीचा दुसरा डोस

आरोग्याधिकारी डॉ. किरण बंडगर यांनी दुसरा डोस घेणाऱ्या ज्येष्ठ नाागरिकांना ४० कोविशिल्ड लसी उपलब्ध करून दिल्या. नरखेड प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत देगाव (वा), वाळूज, एकुरके, बोपले, डिकसळ, मसले चौधरी, भोयरे, हिंगणी, भांबेवाडी, खुनेश्वर आदी १५ गावांतील १५३८ लोकांना लस देण्यात आली. यामध्ये १११६ जणांना पहिला डोस, तर ४२२ जणांना दुसरा डोस देण्यात आला.

यासाठी वैद्यकीय अधिकारी डॉ. किरण बंडगर, सरपंच बाळासाहेब मोटे, आरोग्य अधिकारी उमेश मोरे, आरोग्य सेविका बी. आर. सुरवसे, ग्रामसेवक तात्यासाहेब नाईकनवरे, कल्याण इनामदार, विजयकुमार काळे, रमेश राऊत, उत्तम मोटे, अर्जुन मोटे, विश्वनाथ धावणे, प्रीती जाधव, वैष्णवी पाटेकर, गीतांजली यावलकर, वनीता गरड, रूपाली चवरे आदी आरोग्य व ग्रा.पं. कर्मचारी, आशा वर्कर, नागरिक उपस्थित होते.

Web Title: Second dose of Covishield vaccine for 40 seniors at Narkhed