साखर कारखान्यांचा दुसरा गळीत हंगाम आला तरी ऊसबिले थकली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2021 04:23 IST2021-09-18T04:23:59+5:302021-09-18T04:23:59+5:30
साखर कारखानदारांनी ऊस गाळपास आल्यानंतर १४ दिवसांच्या आत एकरकमी एफआरपी देणे कायद्याने बंधनकारक आहे. दुसरा गळीत हंगाम सुरू होत ...

साखर कारखान्यांचा दुसरा गळीत हंगाम आला तरी ऊसबिले थकली
साखर कारखानदारांनी ऊस गाळपास आल्यानंतर १४ दिवसांच्या आत एकरकमी एफआरपी देणे कायद्याने बंधनकारक आहे. दुसरा गळीत हंगाम सुरू होत आला तरी अद्याप ऊस उत्पादकांना गतवर्षीचे एफआरपीचे पैसे मिळाले नाहीत. श्री संत दामाजी कारखाना, युटोपीयन शुगर यांनी कायद्याचे उल्लंघन करीत शेतकऱ्यांचे ऊस बिलाचे पैसे अद्याप दिले नाहीत. या कारखानदारावर महाराष्ट्र शासनाने कायदेशीर कारवाई करावी व एफआरपीची थकीत रक्कम तत्काळ देण्यास भाग पाडावे, असे निवेदनात म्हटले आहे. यावेळी ॲड. राहुल घुले, जिल्हा संघटक युवराज घुले, तालुकाध्यक्ष श्रीमंत केदार, शहराध्यक्ष हर्षद डोरले, दत्तात्रय गणपाटील, रोहित भोसले आदी उपस्थित होते.
फोटो ओळी : प्रांत कार्यालयातील नायब तहसीलदार कोळी यांना निवेदन देताना ॲड. राहुल घुले, युवराज घुले, श्रीमंत केदार, हर्षद डोरले आदी.