बार्शीत विजयश्री खेचणाऱ्या उमेदवारांचा शोध सुरू
By Admin | Updated: January 24, 2017 20:28 IST2017-01-24T20:28:46+5:302017-01-24T20:28:46+5:30
बार्शीत विजयश्री खेचणाऱ्या उमेदवारांचा शोध सुरू

बार्शीत विजयश्री खेचणाऱ्या उमेदवारांचा शोध सुरू
बार्शीत विजयश्री खेचणाऱ्या उमेदवारांचा शोध सुरू
बार्शी = आॅनलाईन लोकमत
जिल्हा परिषद व तालुका पंचायत समितीच्या जाहीर झालेल्या निवडणुकीत बार्शी तालुक्यातील निवडणुकीच्या हालचालीस वेग आला असून, सर्वच राजकीय पक्षांत जिल्हा परिषद गटासाठी व पंचायत गणातील त्या-त्या आरक्षणानुसार प्रबळ व निवडून येणारा खात्रीचा उमेदवार शोधण्याच्या प्रक्रियेस वेग आला आहे.
या निवडणुकीसाठी बार्शी तालुक्यात जिल्हा परिषदेचे सहा गट तर पंचायत समितीसाठी १२ गण आहेत. आजपर्यंत तालुका पंचायतीवर सलग तीन वेळा भगवा फडकलेला असून, मागील निवडणुकीचे चित्र पाहिल्यास सेना विरूध्द राष्ट्रवादी अशीच लढत झाली आहे. पण सध्या नव्यानेच या तालुक्याच्या राजकारणात सक्रिय झालेला भाजपा असल्याने ही निवडणूक सेना, भाजपा व राष्ट्रवादी काँग्रेस अशीच तिरंगी लढत होणार असल्यामुळे नव्यानेच जाहीर झालेल्या आरक्षणासाठी निवडून येणाऱ्या उमेदवारांचा शोध घेण्यासाठी नेते प्रयत्नशील आहेत. या २०१७ च्या निवडणुकीसाठी पंचायत गणासाठी आरक्षित झालेल्या कारी - नामाप्रवर्ग, उपळे - दु. नामाप्र. महिला, बावी (आ.) - नामाप्र.महिला, सासुरे - अ. जा. महिला व वैराग-अनु.जाती असे या पाच तर आरक्षित झालेले जि. प. गटातील पांगरी-नामाप्र महिला, उपळे (दु.) - नामाप्रवर्ग, मालवंडी-नामाप्रवर्ग व वैराग-नामाप्रवर्ग महिला असे चार जि. प. गटासाठी उमेदवाराचा शोध घेण्यासाठी बैठका होत आहेत तर अनेक इच्छुक असलेले उमेदवारही पक्षातून उमेदवारी मिळण्यासाठी आपापल्या पक्षाकडे पळापळी करताना दिसत आहेत. मागील निवडणुकीत बार्शी तालुक्यातून उपळाई, पांगरी, उपळे (दु.), श्रीपतपिंपरी व वैराग हे जि. प. गट सर्वसाधरण होते तर फक्त मानेगाव गट आरक्षित होता. पण यंदा मात्र पांगरी, उपळे, मालवंडी, वैराग असे चार गट आरक्षित झाले आहेत तर मागील निवडणुकीत पंचायत गणासाठी आगळगाव, पांगरी, कारी, बावी, शेळगाव (आर.) असे चार गण आरक्षित होते.