शिंदे यांच्या जात प्रमाणपत्राच्या वादावर पडदा

By Admin | Updated: July 2, 2014 00:37 IST2014-07-02T00:37:13+5:302014-07-02T00:37:13+5:30

शिंदे यांच्या जात पडताळणी प्रमाणपत्राला आक्षेप

Screen on the issue of Shinde's caste certificate | शिंदे यांच्या जात प्रमाणपत्राच्या वादावर पडदा

शिंदे यांच्या जात प्रमाणपत्राच्या वादावर पडदा


सोलापूर : माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या जात पडताळणी प्रमाणपत्राला आक्षेप घेणाऱ्या याचिकेची आज सुनावणी झाली. हरकतदारांनीही नरमाईची भूमिका घेतल्याने आता त्यावर पडदा पडला आहे.
लोकसभा निवडणुकीसाठी शिंदे आणि खासदार अ‍ॅड. शरद बनसोडे यांनी उमेदवारी अर्जासोबत जोडलेल्या जात पडताळणी प्रमाणपत्राला रिपाइं नेते प्रमोद गायकवाड यांनी आक्षेप घेतला होता. शिंदे यांना प्रमाणपत्र देताना रितसर सुनावणी घेतली नाही. कारणमीमांसा आदेश काढला नाही. दक्षता पथकाकडून अर्जाची छाननी नाही, असे तांत्रिक मुद्दे उपस्थित करून हरकत घेण्यात आली होती. न्यायालयाने याप्रकरणी सुनावणी घेण्याचे आदेश जात पडताळणी समितीला दिले होते.
सुशीलकुमार शिंदे यांच्या वतीने अ‍ॅड. सतीश माने-शिंदे यांनी २८ मार्च रोजी बाजू मांडली होती. न्यायालयाने प्रमाणपत्राची खातरजमा करण्यासाठी जात पडताळणी कार्यालयाकडे प्रकरण पाठविले होते. दक्षता पथकाने चौकशी करून अहवाल सादर केला. त्यानंतर आज सुनावणी घेण्यात आली. शिंदे प्रमाणपत्राला नाहीत तर ते देण्याच्या प्रक्रियेला हरकत होती, असा युक्तिवाद करण्यात आला होता.
विभागीय जाती प्रमाणपत्र समितीचे अध्यक्ष शरद अहिरे, उपायुक्त तथा समितीचे सदस्य पी. एस. कवठे आणि संशोधन अधिकारी बाबासाहेब अरवत यांच्या त्रिसदस्यीय समितीसमोर आज अर्जाची सुनावणी झाली. दक्षता पथकाचा अहवाल सादर करण्यात आला. प्रमोद गायकवाड यावेळी हजर होते; मात्र त्यांनी याबाबत सहमती दर्शविली; तर अ‍ॅड. बनसोडे सुनावणीलाच उपस्थित नव्हते. शिंदे यांच्या वतीने अ‍ॅड. कल्याणराव हिप्परगी उपस्थित होते.

Web Title: Screen on the issue of Shinde's caste certificate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.