विंचू दंशाने मुलाचा मृत्यू
By Admin | Updated: June 26, 2014 01:24 IST2014-06-26T01:24:02+5:302014-06-26T01:24:02+5:30
विंचवाने दंश

विंचू दंशाने मुलाचा मृत्यू
सोलापूर : पिसाळलेला कुत्रा चावल्याने मुलीचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच विंचवाने दंश केल्याने चार वर्षांचा मुलगा मरण पावल्याची घटना मोहोळ तालुक्यातील शेजबाभूळगाव येथे बुधवारी घडली. अथर्व सतीश रणदिवे (वय ४ वर्षे, रा. शेजबाभूळगाव, ता. मोहोळ) असे मरण पावलेल्या मुलाचे नाव आहे. २४ जून रोजी रात्री आठ वाजता तो घरी खेळत असताना उजव्या पायाच्या बोटाला विंचवाने डंख मारला. यामुळे वेदना होऊन तो रडू लागला. रात्री त्रास वाढल्याने सोलापुरातील यशोधरा हॉस्पिटलमध्ये दाखल केले. उपचार सुरू असताना तो मरण पावला.
अथर्व याला वडील नाहीत,आईला तो एकुलता. विंचवाने डंख मारल्याने मुलाचा मृत्यू झाल्याने लोकांमधून हळहळ व्यक्त होत आहे. ग्रामीण भागात प्राथमिक आरोग्य केंद्र व ग्रामीण रुग्णालयात प्राणी दंशाच्या लसी उपलब्ध नसल्याने या समस्या निर्माण झाल्या आहेत. जिल्हा आरोग्य अधिकारी व जिल्हा शल्य चिकित्सकांनी ही बाब गांभीर्याने घ्यावी अशी मागणी होत आहे.