माढा, करमाळ्यासह पाच तालुक्यांतील शाळा लवकरच होणार सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:48 IST2021-09-02T04:48:42+5:302021-09-02T04:48:42+5:30
बुधवारी, कुर्डूवाडी पंचायत समितीतील आढावा बैठकीनंतर सीईओ स्वामी यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले, माढा तालुक्यातील दहा ...

माढा, करमाळ्यासह पाच तालुक्यांतील शाळा लवकरच होणार सुरू
बुधवारी, कुर्डूवाडी पंचायत समितीतील आढावा बैठकीनंतर सीईओ स्वामी यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले, माढा तालुक्यातील दहा ग्रामसेवकांच्या कामकाजबाबात विविध दृष्टीने प्रगती दिसून आलेली नाही, ही गंभीर बाब आहे. कोरोनाच्या नावावर कोणत्याही प्रकारचा विकास थांबता कामा नये. गावातील अंगणवाडी, झेडपी शाळा यांची नळ जोडणी, आधार जोडणी सुरू आहे. उर्वरित कामेही संबंधित अधिकाऱ्यांनी काही दिवसांत पूर्ण करावीत. जिल्ह्यात २ हजार ७०० रोजगार हमीची कामे सुरू आहेत, तर बोगस डॉक्टरांच्या बाबतीत नागरिकांही सतर्क होणे आवश्यक असून, यापुढे कोणी बोगस डॉक्टर आढळल्यास कठोर कारवाई करण्यात येईल, असेही यावेळी बोलताना स्वामी यांनी सांगितले.
.........
सात लाख मुलांची आरोग्य तपासणी
जिल्ह्यात १ ते ८ वयोगटातील ९ लाख ७७ मुले आहेत. त्यातील ६ लाख ८० हजार मुलांची आरोग्य तपासणी पूर्ण झाली आहे. याचबरोबर यातीलच ८० मुले ही हृदयरोग यासारख्या गंभीर आजाराने पीडित असून, त्यांच्यावरही झेडपीमार्फत उपचार सुरू केलेले आहेत. त्याचबरोबर मुलांच्या लसीकरणाचाही कार्यक्रम आखला जात आहे. त्यांना मिळालेल्या पहिल्या रेग्युलर लसीकरणाचाही फायदा या काळात झाला आहे, असे सीईओ स्वामी यांनी सांगितले.