सोलापूर जिल्ह्यातील पात्र शेतकºयांना लाभ मिळेपर्यंत योजना सुरु राहणार : पालकमंत्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2017 04:30 PM2017-10-18T16:30:11+5:302017-10-18T16:31:52+5:30

The scheme will continue till the eligible farmers in Solapur district get the benefit: Guardian Minister | सोलापूर जिल्ह्यातील पात्र शेतकºयांना लाभ मिळेपर्यंत योजना सुरु राहणार : पालकमंत्री

सोलापूर जिल्ह्यातील पात्र शेतकºयांना लाभ मिळेपर्यंत योजना सुरु राहणार : पालकमंत्री

Next
ठळक मुद्देजिल्ह्यातील पंचवीस शेतकºयांना कर्जमाफी प्रमाणपत्र देऊन सन्मानमुंबईत झालेल्या कार्यक्रमाचे थेट प्रसारणसोलापूर जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी


आॅनलाइन लोकमत सोलापूर
सोलापूर दि. १८ :-  छत्रपती शिवाजी महाराज सन्मान योजनेतून शेतकºयांना सन्मान केला जात आहे. पात्र शेतकºयांस लाभ मिळेपर्यंत ही योजना सुरु राहील, असे प्रतिपादन पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी आज येथे केले.
छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतील पात्र शेतकरी कुटुंबाचा आज पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. जिल्हाधिकारी कार्यालयातील बहुद्देशीय सभागृहात हा कार्यक्रम झाला. यावेळी जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले, सहकार विभागाचे अप्पर निबंधक शैलेश कोतमिरे, जिल्हा उपनिबंधक अविनाश देशमुख, जिल्हा विशेष लेखापरीक्षक सुरेश काकडे, अग्रणी बँक व्यवस्थापक सुरेश श्रीराम आदी उपस्थित होते.
पालकमंत्री  विजयकुमार देशमुख म्हणाले, ह्य राज्य शासनाने शेतकºयांना कर्जमाफी देण्याचा निर्णय जूनमध्ये घेतला. यासाठी जिल्ह्यातून सुमारे दोन लाख वीस हजार शेतकºयांनी अर्ज केले. त्यापैकी पात्र ठरलेल्या शेतकºयांना या योजनेचा लाभ मिळण्यास सुरवात होईल. राज्य शासनाने शेतकºयांच्या हितासाठी घेतलेल्या या निर्णयाची सोलापूर जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी होत आहे़
या योजनेत पात्र ठरलेल्या प्रत्येक शेतकºयास लाभ मिळले. तोपर्यत ही  योजना कार्यान्वित राहील. शेवटच्या शेतकºयास लाभ होईल याची काळजी जिल्हा प्रशासन आणि सहकार विभागाचे अधिकारी - कर्मचारी यांनी घ्यावी अशी सूचनाही पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी केली.
यावेळी पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्या हस्ते प्रातिनिधीक स्वरुपात जिल्ह्यातील पंचवीस शेतकºयांना कर्जमाफी प्रमाणपत्र आणि भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला. 
अविनाश देशमुख यांनी प्रास्ताविक केले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  यांच्या उपस्थितीत मुंबईत झालेल्या कार्यक्रमाचे थेट प्रसारण करण्यात आले. यावेळेस जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी बसवराज बिराजदार,  जिल्हा बँकेचे सरव्यवस्थापक किसन मोटे, शहर उपनिबंधक कुंदन भोळे आदी उपस्थित होते.

Web Title: The scheme will continue till the eligible farmers in Solapur district get the benefit: Guardian Minister

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.