शहरं
Join us  
Trending Stories
1
घरातील सर्वांचा विरोध; तरीही वैष्णवीचा लव मॅरेजसाठी हट्ट, मामाने सगळा घटनाक्रम सांगितला..
2
Vaishnavi Hagwane Case : 'वैष्णवीचे बाळ आणायला गेलो,आम्हाला बंदूक दाखवली'; मामांनी सगळंच सांगितलं
3
 काश्मीरमधील किश्तवाड येथील चकमकीत दोन दहशतवाद्यांना कंठस्नान, दोघांना लष्कराने घेरले 
4
हेरगिरी प्रकरणात ज्योती मल्होत्राला दिलासा नाही, पोलिस कोठडीत आणखी चार दिवसांची वाढ; बँक खात्याची चौकशी सुरूच
5
पाकिस्तानने स्वतः युद्धविरामाची चर्चा केली, परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी अमेरिकेच्या मध्यस्थीचा दावा फेटाळला!
6
मानवतेचा महामेरु! पत्नी कॅन्सरने गेली, इतर रुग्णांची पैशांअभावी वणवण पाहता पतीची २० लाखांची देगणी
7
आधी वैभव सूर्यवंशीसोबत खोटा फोटो, आता प्रीती झिंटाची थेट कोर्टात धाव, नेमकं प्रकरण काय?
8
Corona Virus : बूस्टर डोस घ्यावा लागेल का? चीन आणि भारतासह ५ देशांमध्ये कोरोनाच्या नव्या लाटेचा धोका
9
जयंत पाटलांची लागणार होती वर्णी, भाजपासोबतची बोलणी अडली; अखेर छगन भुजबळांनी संधी साधली!
10
“मुंबई महापालिका निवडणुकीच्या तयारीला लागा; जागावाटपाची चर्चा नको, मित्रपक्षांवर टीका टाळा”
11
नवऱ्याच्या सिनेमाच्या स्क्रीनिंगला पोहोचली अमृता खानविलकर, हिमांशुच्या 'त्या' कृतीवर खिळल्या नजरा
12
'ग्रोव'चा सामान्य गुंतवणूकदारांना धक्का? छोटे व्यवहारही होणार महाग, ब्रोकरेज शुल्क इतक्या पटींनी वाढणार
13
दिल्ली उद्ध्वस्त करण्याची योजना, रावळपिंडीत ट्रेनिंग घेतलं! आयएसआयचे दोन हेर पोलिसांच्या ताब्यात
14
Vaishnavi Hagawane Death Case : 'दाल मे कुछ काला है'; शरद पवार गटाची रूपाली चाकणकर, चित्रा वाघ यांच्यावर खरमरीत टीका
15
मोठी बातमी! अथिया शेट्टीने बॉलिवूडला ठोकला रामराम, आई झाल्यानंतर घेतला निर्णय! चाहत्यांना धक्का
16
अनिल गोटेंनी टाळे ठोकलेल्या खोलीत पैशांचे घबाड सापडले; कुलूप तोडून पोलीस आत गेले... 
17
जगभर विनाश होईल, आर्थिक मंदी येईल...; बाबा वेंगाची भयानक भाकितं, जगाचा अंतही सांगून टाकला!
18
"पती निर्दोष, दोनदा पाकिस्तानला गेला कारण..."; शहजादला अटक होताच ढसाढसा रडली रझिया
19
दीपिका पादुकोणचे नखरेच जास्त! मानधन अन् अटी ऐकून दिग्दर्शकाने 'या' सिनेमातून काढलं
20
माझे लग्न पाकिस्तानात करून द्या, ज्योती मल्होत्राची विनंती; चॅटिंग आणि डायरीच्या नोंदीतील माहिती

वेळापत्रक जाहीर; उद्यापासून रद्द झालेल्या रेल्वे आरक्षण तिकिटाची रक्कम मिळणार 

By appasaheb.patil | Updated: May 25, 2020 17:20 IST

मध्य रेल्वे; गर्दी टाळण्यासाठी रेल्वे प्रशासनाने बनविले वेळापत्रक

ठळक मुद्दे- लॉकडाऊनमुळे भारतीय रेल्वे मंत्रालयाने केल्या होत्या रेल्वे रद्द- रेल्वे रद्दमुळे प्रवाशांना तिकीट करावे लागले कॅन्सल- तिकीट परतावा मिळत असल्याने प्रवाशांनी केले समाधान व्यक्त

सोलापूर : कोरोनामुळे देशभरात लॉकडाऊन करण्यात आले़ यामुळे भारतीय रेल्वे प्रशासनाने यात्री, मेल, एक्सप्रेस गाड्या रद्द केल्या होत्या़ त्याचप्रमाणे आरक्षण केंद्र सुद्धा बंद करण्यात आले होते. ज्या प्रवाशांनी आरक्षित तिकीट खरेदी केले होते, त्या प्रवाशांना तिकीट रद्द करून त्या तिकीटाची  रक्कम परत करण्यास आजपासून सुरू करण्यात आल्याची माहिती मध्य रेल्वेने दिली.

दरम्यान, लॉकडाऊन काळात फिजिकल डिस्टन्सची अंमलबजावणी योग्य रितीने व्हावी यासाठी रेल्वे प्रशासनाने वेळापत्रक बनविले आहे़ अपेक्षित गर्दीच्या चांगल्या व्यवस्थापनासाठी २६ मे पासून आरक्षण खिडकीवर (पीआरएस) काउंटरवर परतावा देण्याचे वेळापत्रक ठरविले  आहे. २२ मार्च ते ३० जून २०२० याच कालावधीत आरक्षित केलेल्या तिकीटांची रक्कम मिळणार असल्याचेही रेल्वे प्रशासनाने सांगितले आहे.

२३ ते ३१ मार्च पर्यंत तिकीट काढलेल्या प्रवाशांच्या तिकीटाची रक्कम २६ मे २०२० पासून देण्यात येणार आहे. १ ते १४ एप्रिल पर्यंतच्या तिकीटाचे पैसे १ जून २०२० रोजी पासून मिळणार, १५ ते ३० एप्रिल पर्यंतच्या तिकिटाचे पैसे ७ जून २०२० पासून मिळणार, १ मे ते १५ मे पर्यंत काढलेल्या तिकीटाचे पैसे १४ जूनपासून मिळणार,  १६ ते ३१ मे पर्यंतच्या प्रवाशांना २१ जून आणि १ जून ते ३० जून पर्यंतच्या प्रवाशांचा तिकीट परतावा २८ जून पासून देण्यात येणार असल्याचे रेल्वे प्रशासनाने सांगितले. कोविड -१  च्या नियंत्रणासाठी जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांचे कठोर पालन करण्याचे निर्देश सर्वांना देण्यात आले आहेत.  काउंटरवर होणारी गर्दी पाहता गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी आरपीएफ पोलीसांचे पथक तैनात करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले, तरी आरक्षित तिकीट घेतलेल्या प्रवाशांनी आपल्या जवळचे तिकीट रद्द करून त्या तिकीटांची रक्कम वेळापत्रकानुसार घेऊन जावावी असे आवाहन वरिष्ठ वाणिज्य मंडल प्रबंधक प्रदीप हिरडे यांनी केले आहे.

टॅग्स :Solapurसोलापूरrailwayरेल्वेcentral railwayमध्य रेल्वेcorona virusकोरोना वायरस बातम्या