चोरांच्या धास्तीने दोन एकर ऊस पेटविला

By Admin | Updated: November 5, 2014 15:13 IST2014-11-05T15:12:04+5:302014-11-05T15:13:55+5:30

चोरीला दोन दिवस उलटले, पोलिसांत फिर्याद दिली, गावकर्‍यांसह पीडितांनी चोरांचा माग शोधला, पण ते सापडले नाहीत. शेवटी उसात चोर लपल्याची अफवा पसरली.

The scare of thieves blew up two acres of sugarcane | चोरांच्या धास्तीने दोन एकर ऊस पेटविला

चोरांच्या धास्तीने दोन एकर ऊस पेटविला

सोलापूर : चोरीला दोन दिवस उलटले, पोलिसांत फिर्याद दिली, गावकर्‍यांसह पीडितांनी चोरांचा माग शोधला, पण ते सापडले नाहीत. शेवटी उसात चोर लपल्याची अफवा पसरली. सगळ्या बाजूने उसाला घेराव घालण्यात आला. पोलिसांना कळविले. दरम्यान काही ग्रामस्थांनी उसात चोर लपलेत ना, मग ऊसच पेटवू, असा निर्णय घेऊन गाळपाच्या मार्गावर असलेला दोन एकर ऊस पेटवून देण्यात आला. पाहता पाहता नगदी पीक ऊस जळून खाक झाला. हा प्रकार कंदलगाव (ता. दक्षिण सोलापूर) येथे मंगळवारी सकाळच्या सुमारास घडला.
संगप्पा साबा यांच्या वस्तीवर दोन दिवसांपूर्वी चोरी झाली. यात ६६ हजारांचा ऐवज पळविण्यात आला. पोलिसांत फिर्याद दिल्यानंतर पोलिसांसह गावकर्‍यांनी चोरांचा शोध घेतला. मात्र चोर काही सापडले नाहीत. मंगळवारी सकाळच्या सुमारास उसात चोर लपल्याची अफवा पसरविण्यात आली. यामुळे सगळ्यांनी फडाला गराडा घातला. आराडाओरडा, आरोळी ठोकून झाली. चोर काही बाहेर आले नाहीत. पोलीस घटनास्थळावर पोहोचायला काही मिनिटे शिल्लक असताना एकाने उसाच्या फडाला पेटवून देण्याची शक्कल लढविली. स्वत: साबा यांनीही होय, नाही म्हणून दुजोरा दिला. काडी ओढली आणि उभा ऊस पाचच मिनिटांत जळून खाक झाला. चोरही सापडले नाहीत आणि चोरीचा मुद्देमालही.

Web Title: The scare of thieves blew up two acres of sugarcane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.