फिर्यादीत म्हटले आहे की, ‘रविवारी सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास मिरजगाव (ता. कर्जत) येथील पाहुणे जेऊर एसटी स्टँडवर आले होते. त्यांना घरी घेऊन जाताना बाजारतळावर शंकर विष्णू माने हा खुनशी वृत्तीने पाहून “बाजारतळाकडे या,” असे म्हणून तेथून निघून गेला. नंतर मी पप्पू माने व नितीन माने यांच्याबरोबर जनावरांच्या दवाखान्यासमोर येऊन बोलत थांबलो. तेव्हा मागून विठ्ठल जाधव, अर्जुन माने, रणजित माने, लखन माने, शंकर माने हे आले. विठ्ठल माने यांनी ‘तू माझ्या मामाकडे का बघतोस?’ असे म्हणून या लोकांनी तोंडावर, पोटात, डोक्यात व पाठीत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. या प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.
मामाकडे का बघतो म्हणत तरुणाला लाथाबुक्क्याने मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2021 04:24 IST