सावळेश्वरमध्ये दोन उमेदवारांना समान मते
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2021 04:22 IST2021-01-20T04:22:42+5:302021-01-20T04:22:42+5:30
लांबोटी : सावळेश्वर (ता. मोहोळ) ग्रामपंचायतीत सताधारी धनाजी गावडे यांच्या गटाचे ११ पैकी ६ सदस्य, तर माजी सभापती ...

सावळेश्वरमध्ये दोन उमेदवारांना समान मते
लांबोटी : सावळेश्वर (ता. मोहोळ) ग्रामपंचायतीत सताधारी धनाजी गावडे यांच्या गटाचे ११ पैकी ६ सदस्य, तर माजी सभापती समता गावडे यांच्या पॅनलचे ५ सदस्य निवडून आले. वाॅर्ड क्रमांक चारमधून दादाराव लांडगे व मारुती रामचंद्र लांडगे यांना समान (३५८) मते मिळाली. त्यामधून ईश्वरचिठ्ठीद्वारे दादाराव महादेव लांडगे विजयी झाले.
वॉर्ड क्रमांक एकमधून अर्जुन साबळे यांना ३५२, तर अनिकेत गुंड यांना ३३८ आणि पार्वती गावडे यांना ३६० मते मिळाली. वॉर्ड नंबर दोनमधून सखाराम साठे यांनी २५८, कल्पना टेकाळे २५२, भागाबाई सोनटक्के २४५, तर वॉर्ड नंबर तीनमधून अनिता गावडे यांनी ३८३ मते मिळविली. सोनाली पैकेकरी यांनी ३७३ मते मिळविली. वाॅर्ड क्रमांक चारमधून फारुक तांबोळी यांनी ३८५ मते मिळविली. दादा लांडगे यांनी ३५८, तर कल्पना गावडे यांनी ३५७ मते मिळविली.