शहरं
Join us  
Trending Stories
1
ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारे यांची गाडी अज्ञात व्यक्तीने पेटवली; जालन्यातील घटना
2
Monsoon update: यंदाची दिवाळी पावसातच जाणार का? मान्सून भारतातून कधी परत जाणार?
3
डोनाल्ड ट्रम्प अन् इलॉन मस्कची 'दिलजमाई' झाली? चार्ली किर्कच्या शोकसभेत दिसले एकत्र! ‘तो’ एक फोटो चर्चेत
4
FD-RD विसरुन जाल, LIC ची ही स्कीम आहे जबरदस्त, मुलीच्या लग्नासाठी मिळेल २७ लाखांची रक्कम
5
फक्त गरबाच खेळा...हुल्लडबाजी नको; दांडियामध्ये साध्या वेशात महिला पोलीस सहभागी होणार
6
H-1B व्हिसाने हैराण झालेल्यांना चीनची ऑफर; भारतीयांसाठीही मोठी संधी! काय आहे नवा ‘के- व्हिसा’?
7
Viral News: कानपूरहून दिल्लीला जाणाऱ्या इंडिगोच्या विमानात उंदीर; उड्डाणाला साडेतीन तास विलंब!
8
आम्ही गरिबीत, तुमची मौज का? आणखी एका देशात लोक रस्त्यावर; जनतेच्या पैशाची लूट, पसरला असंतोष
9
अमूलनं बटर, तूप, चीज, आईस्क्रीम आणि चॉकलेटच्या किमती केल्या कमी; प्रत्येक वस्तूवर किती बचत होणार? जाणून घ्या
10
बगराम तळावरून सुरु झाला नवा संघर्ष? डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीवर तालिबानचे प्रत्युत्तर
11
शेअर बाजारात मोठी घसरण, Sensex ४७५ अंकानी आपटला; Nifty मध्येही घसरण, IT शेअर्समध्ये जोरदार विक्री
12
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींवर नवदुर्गा कृपा, पद-पैसा-लाभ; अकल्पनीय यश, अनपेक्षित भरभराट!
13
"आता जे गरजेचं ते करावंच लागेल"; सरसंघचालक भागवत अमेरिकेच्या टॅरिफ आणि 'एच१ बी'बद्दल स्पष्टच बोलले 
14
Mumbai: गावी जाण्यासाठी पैसे देण्यास नकार दिल्यानं पत्नीची हत्या; कांदिवली येथील घटना!
15
देवोलिना भट्टाचार्जी पुन्हा प्रेग्नंट? फोटोशूटवरुन चर्चांना उधाण; ९ महिन्यांपूर्वीच दिला मुलाला जन्म
16
नौशादनं 'आकाश' बनून फसवलं, एका मुलाच्या आईसोबत लग्न केलं अन् ४ मित्रांसोबत मिळून...; घटना ऐकून येईल चीड!
17
आजपासून 'GST' उत्सव! मध्यम वर्गाला होणार मोठा फायदा; खरेदी वाढणार, अर्थव्यवस्थेला बूस्टर मिळणार
18
पाकिस्तानच्या नाकी नऊ आणणाऱ्या अभिषेक शर्माचा नावावर विश्वविक्रमाची नोंद, युवराजलाही टाकले मागे
19
GST कपातीनंतर आता कोणत्या वस्तूंवर सर्वाधिक टॅक्स?; यादी वाचा, अन्यथा खिशाला बसेल झळ
20
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते 'मिशन शक्ती ५.०'चा शुभारंभ; महिला सुरक्षेवर भर, पोलिसांत महिलांचा सहभाग वाढला!

सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धा ; यंदा राज्यातील ७६ तालुक्यांची झाली निवड

By appasaheb.patil | Updated: December 20, 2018 16:36 IST

चार तालुके वगळले : या वर्षीच्या स्पर्धेसाठी नव्याने पाच तालुक्यांचा समावेश

ठळक मुद्देपुणे, सांगली, सातारा व सोलापूर जिल्ह्यातील १६ तालुक्यांचा समावेश सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धा २०१९ साठी ७६ तालुक्यांची निवड मागील वर्षीप्रमाणे याही वर्षी सोलापूर जिल्ह्यातील सहा तालुक्यांचा समावेश

सोलापूर : सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धा २०१९ साठी ७६ तालुक्यांची निवड करण्यात आली असून, मागील वर्षीच्या स्पर्धेसाठीचे चार तालुके वगळून नव्याने पाच तालुक्यांचा समावेश केला आहे. मागील वर्षीप्रमाणे याही वर्षी सोलापूर जिल्ह्यातील सहा तालुक्यांचा यामध्ये समावेश राहणार आहे. 

पाणी फाउंडेशनच्या वतीने मागील दोन वर्षांपासून वॉटर कप स्पर्धा घेतली जाते. या स्पर्धेसाठी मागील वर्षी राज्यातील ७५ तालुक्यांची निवड करण्यात आली होती व या तालुक्यांतील जवळपास ४ हजार गावांनी प्रत्यक्षात स्पर्धेत भाग घेतला होता. यावर्षी मागील वर्षीच्याच २४ जिल्ह्यांतील चार तालुक्यांना या वर्षीच्या स्पर्धेसाठी वगळले असून, नव्याने पाच तालुक्यांचा समावेश केला आहे. मागील दोन वर्षांप्रमाणेच याही वर्षी ८ एप्रिल ते २२ मे हा स्पर्धेचा कालावधी आहे.

पश्चिम महाराष्टÑातील पुणे, सांगली, सातारा व सोलापूर जिल्ह्यातील १६ तालुक्यांचा समावेश केला आहे. पुणे जिल्ह्यातील बारामती, पुरंदर, सातारा जिल्ह्यातील कोरेगाव, खटाव, माण, सोलापूर जिल्ह्यातील करमाळा, माढा, बार्शी, उत्तर सोलापूर, सांगोला व मंगळवेढा तर सांगली जिल्ह्यातील आटपाडी, खानापूर (विटा), जत, कवठेमहांकाळ व तासगाव तालुक्यांचा पुढील वर्षीच्या स्पर्धेसाठी समावेश आहे. विदर्भातील सात जिल्ह्यातील मागील वर्षीचे सर्वच तालुके याही वर्षाच्या स्पर्धेसाठी कायम ठेवले आहेत. 

बुलडाणा जिल्ह्यातील मोताळा, जळगाव (जामोद), संग्रामपूर, अकोला जिल्ह्यातील अकोट, पातूर, बार्शी टाकळी, तेल्हारा, वाशिम जिल्ह्यातील कारंजा लाड, मंगरुळपीर, यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड, यवतमाळ, घाटंजी, दारव्हा, राळेगाव, कळंब, वर्धा जिल्ह्यातील आर्वी, देवळी, कारंजा घाडगे, सेलू, अमरावती जिल्ह्यातील धारणी, वरुड, मोर्शी, चिखलदरा, नांदगव ख. तसेच            नागपूर जिल्ह्यातील नरखेडचा समावेश आहे.

उत्तर महाराष्टÑातील अहमदनगर तालुक्यातील जळगाव जिल्ह्यातील अमळनेर, पारोळा, चाळीसगाव, जामनेर, नंदूरबार जिल्ह्यातील शहादा व नंदूरबार, धुळे जिल्ह्यातील धुळे व शिंदखेडा, नाशिक जिल्ह्यातील चांदवड, सिन्नूर, अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी, अहमदनगर, पारनेर, कर्जत व नव्याने समावेश झालेला संगमनेर. मराठवाड्यातील औरंगाबाद जिल्ह्यातील खुलताबाद, फुलंब्री, वैजापूर, जालना जिल्ह्यातील जाफ्राबाद, बीड जिल्ह्यातील केज, धारुर, अंबाजोगाई, आष्टी, परळी, बीड, उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब, उस्मानाबाद, लातूर जिल्ह्यातील औसा, निलंगा, देवणी, हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी, नांदेड जिल्ह्यातील भोकर व लोहा तर परभणी जिल्ह्यातील जिंतूर व गंगाखेड या तालुक्यांचा समावेश आहे. 

इंदापूर तालुका वगळला च्मागील स्पर्धेतील पुणे जिल्ह्यातील इंदापूर, अहमदनगरचा जामखेड व उस्मानाबाद जिल्ह्यातील भूम व परंडा हे तालुके वगळले आहेत. पुढील स्पर्धेसाठी चाळीसगाव, जामनेर, बीड व गंगाखेड हे तालुके नव्याने घेण्यात आले आहेत. तांत्रिक कारणामुळे तालुके वगळण्यात आल्याचे सांगण्यात आले.

मागील वर्षीप्रमाणेच ४५ दिवसांची स्पर्धा राहील. कुटुंबसंख्येच्या दुप्पट झाडे लावल्यास पाच गुण हा गुणांकनातील बदल व दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर मशिनरीच्या कामातही बदल करण्यात आला आहे. - डॉ. अविनाश पोळप्रमुख मार्गदर्शक, पाणी फाउंडेशन

टॅग्स :SolapurसोलापूरWater Cup Competitionवॉटर कप स्पर्धाSolapur Collector Officeसोलापूर जिल्हाधिकारी कार्यालय