सत्यम सत्यम म्हणताच लक्ष लक्ष हातानी टाकल्या अक्षता
By Admin | Updated: January 13, 2017 19:37 IST2017-01-13T19:37:23+5:302017-01-13T19:37:23+5:30
पांढ-या शुभ्र बाराबंदी पोषाखातील भक्त जणू दूधाच्या सागराप्रमाणे सिध्देश्वर तलावाभोवती जमला... मानाच्या सात काठ्या येताच श्री सिध्देश्वराचा जयघोष करत अक्षता सोहळ्याला सुरुवात झाली.

सत्यम सत्यम म्हणताच लक्ष लक्ष हातानी टाकल्या अक्षता
>ऑनलाइन लोकमत
सोलापूर, दि. 13 - पांढ-या शुभ्र बाराबंदी पोषाखातील भक्त जणू दूधाच्या सागराप्रमाणे सिध्देश्वर तलावाभोवती जमला... मानाच्या सात काठ्या येताच श्री सिध्देश्वराचा जयघोष करत अक्षता सोहळ्याला सुरुवात झाली. सत्यम सत्यम म्हणताच लक्ष लक्ष हातानी अक्षता टाकल्या.
दुपारी २ च्या सुमारास सारही नदीध्वज सन्मत्ती कट्ट्याजवळ आले. त्यानंतर कुंभार समाजाच्या मानक-यांनी यात्रेचे मानकरी हिरेहब्बू आणि देशमुख यांना विवाह सोहळ्याचा विडा दिला. त्यानंतर सुहास शेटे यांनी समंती वाचन केले. त्यानंतर सुगडी पूजन अर्थात गाडग्यांचे पूजन करण्यात आले. मंगलाष्टिका झाल्यावर लाखो भाविकानी अक्षता टाकल्या आणि विवाह पार पडला.
काय आहे अख्यायिका?
- सिध्देश्वर महाराजांचे वास्तव्य सोलापूरात असताना त्यांच्या सेवेत असलेली एक कुंभार कन्या त्यांची निस्सिम भक्त बनली आणि तिने सिध्देश्वर महाराजांशी विवाह करण्याचा हट्ट धरला. मात्र सिध्देश्वर महारांनी तिला नकार दिला. मात्र, कुंभार कन्या हट्ट सोडत नव्हती. त्यामुळे महाराजानी त्यांच्या युगदंडाशी विवाह करण्याची परवानगी दिली आणि या कन्येचा सिध्दरामेश्वरांच्या युगदंडाशी विवाह झाला. त्या घटनेचे स्मरण म्हणून दरवर्षी हा प्रतिकात्मक सोहळा पाच दिवस चालतो. तीच सिध्देश्वरची यात्रा म्हणून ओळखली जाते. योगदंडाचे प्रतिक म्हणून आता नंदीध्वजाशी विवाह लावण्यात येतो.