वडाळ्यावर साठे गटाची सत्ता कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2021 04:24 IST2021-01-19T04:24:41+5:302021-01-19T04:24:41+5:30

वडाळा : उत्तर सोलापूर तालुक्यातील वडाळा ग्रामपंचायतीवर साठे गटाने अवताडे गटाचा पराभव करत ६० वर्षांची सत्ता कायम ठेवली. ...

The Sathe group continues to rule over Wadala | वडाळ्यावर साठे गटाची सत्ता कायम

वडाळ्यावर साठे गटाची सत्ता कायम

वडाळा : उत्तर सोलापूर तालुक्यातील वडाळा ग्रामपंचायतीवर साठे गटाने अवताडे गटाचा पराभव करत ६० वर्षांची सत्ता कायम ठेवली.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष बळीराम साठे यांची वडाळा ग्रामपंचायतीवर ६० वर्षे सत्ता कायम राहिली आहे. ग्रामपंचायत पंचवार्षिक निवडणुकीत लोकनेते बळीराम साठे ग्रामविकास पॅनलने उमेदवार उभे करून बाबासाहेब अवताडे परिवर्तन पॅनलचा पराभव करून चार उमेदवारांचे डिपॉझिटही जप्त केले. निवडणुकीत १३ सदस्यांपैकी १ बिनविरोध झाला. ग्रामपंचायतीचा निकाल लागताच ग्रामस्थ आणि बळीराम साठे यांच्यासह ग्रामपंचायत सदस्यांनी पेढे व गुलाल उधळून आनंद व्यक्त केला.

---

फोटो : १८ वडाळा

नूतन ग्रामपंचायत सदस्य व गावातील नागरिकांसोबत हात उंचावून आनंद व्यक्त करताना बळीराम साठे.

Web Title: The Sathe group continues to rule over Wadala