शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

शिवजयंतीसाठी सातारा सजला

By admin | Updated: February 18, 2015 23:49 IST

तरुणाई तेजाळली : शहरातील पेठांना पताकांचे तोरण; शिवज्योत आणण्यासाठी युवकांची स्वारी गडांवर

सातारा : आज छत्रपती शिवरायांची जयंती जिल्ह्यात साजरी होत आहे. शिवरायांचा पराक्रम नुसता ऐकून मरणासन्न अवस्थेला टेकलेल्या माणसाच्या अंगातही चैतन्याची लाट उसळते. मग ही तर सळसळत्या रक्ताची तरुणाई आहे. डोगरकपाऱ्यातील पाऊलवाटा तुडवत मैलोन्मैल धावत जाऊन शिवज्योत आणण्यासाठी युवकांची अनवाणी पावले शिवरायांच्या पदस्पर्शानं पुनीत झालेल्या गडांवर पोहोचली आहेत तर शहरातील विविध पेठांमध्ये शिवजयंतीची जय्यत तयारी केली असून पेठांना भगव्या पताकांची तोरणं बांधल्यामुळं अवघा सातारा शिवमय झाला आहे. आज घुमणार ढोल-ताशांचा आवाज सातारा : नगरपालिकेच्या वतीने गुरुवार, दि. १९ रोजी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती विविध कार्यक्रमाने साजरी करण्यात येणार आहे.शिवजयंतीनिमित्त राजवाड्यास आकर्षक पद्धतीने विद्युतरोषणाई करण्यात येणार आहे. तसेच राजवाडा गांधी मैदान येथील सोमण स्मारक या ठिकाणी शिवप्रतिमेची प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. पोवई नाका येथील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या ठिकाणी आकर्षक विद्युतरोषणाई करण्यात येणार आहे.राजवाडा येथील शिवप्रतिमेची पूजा सकाळी ८.३० वाजता खासदार उदयनराजे भोसले, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, नगराध्यक्ष सचिन सारस, उपनगराध्यक्षा दिनाज शेख, सभापती, नगरसेवक आदींच्या उपस्थितीत करण्यात येणार आहे.सायंकाळी ५ वाजता शिवप्रतिमेची भव्य मिरवणूक राजवाडा येथून सुरू होणार असून, त्यामध्ये प्रथम महारुद्र प्रतिष्ठान, ताल अधिष्ठान, पुणे यांचे ढोल ताशे व ध्वज पथक असे ५० ते ६० कलाकारांचे पथक त्यांची कला सादर करणार आहे. त्यामागे शिवमुद्रा, त्यामागे पालिकेच्या शिक्षण मंडळातील विद्यार्थ्यांचे झांज पथक, त्यानंतर बालशिवाजी युवा प्रतिष्ठान, महिला मल्लखांब पथक व कोकणी बाजा पथक तसेच शहरातील विविध शैक्षणिक संस्थांचे दहा चित्ररथ सहभागी होणार आहेत.शिवजयंती उत्साहात सातारकरांनी सहभागी व्हावे, असे आवाहन नगराध्यक्ष सचिन सारस, उपनगराध्यक्षा दिनाज शेख यांनी केले आहे. (प्रतिनिधी)बुरुज, तटबंदीच्या प्रतिकृतीसातारा शहरात केसरकर पेठेतील बालगणेश मंडळाने स्वागतकमान उभारली आहे. कमानीच्या दोन्ही बाजूला बुरूज केले आहेत. तसेच किल्ल्यावरील तटबंदीप्रमाणे रंगरंगोटी करून कापडी भिंती उभारल्या आहेत. ऐतिहासिक देखावे उभारून त्यासमोर शिवरायांच्या पुतळ्याची स्थापना केली जाणार आहे.जिल्हा परिषदेतर्फे प्रतापगडावर उत्सवसातारा : जिल्हा परिषदेच्या वतीने दि. १९ फेब्रुवारी रोजी प्रतापगडावर शिवजयंती उत्सव होणार आहे. यानिमित्त शिवव्याख्याते व ज्येष्ठ साहित्यिक प्रा. सतीश कुमदाळे यांचे शिवचरित्रावर व्याख्यान होणार आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेचे अध्यक्ष माणिकराव सोनवलकर यांनी दिली.गुरुवारी सकाळी ८ ते ८.३० ध्वजारोहण व भवानीमातेची पूजा, ८.३० ते ९.३० मिरवणुकीने पुतळयापर्यंत जाणे व पुष्पहार अर्पण करणे, ९.३० ते १०.३० विषय समित्यांची सभा, १०.३० ते ११.४५ शिवचरित्रावर व्याख्यान आणि दुपारी १२.0५ वाजता आरती, असे कार्यक्रम होणार आहेत. शिवजयंती उत्सवासाठी उपाध्यक्ष रवी साळुंखे, मुख्य कार्यकारी अधिकारी जी श्रीकांत, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी तानाजी कोहिनकर आदी उपस्थित राहणार आहेत. शिवप्रेमींनी उपस्थित रहावे, असे आवाहन सोनवलकर यांनी केले आहे.तरुणाईला वेड‘राजे’ अन् ‘महाराज’चे खटाव : शिवजयंती हटके पद्धतीने साजरी करण्याची क्रेझ सध्या युवकांमध्ये दिसून येत आहे. कुणी सामाजिक उपक्रम राबवून गरजंूना मदतीचा हात देत आहे तर कुणी साहसी प्रात्यक्षिकांचे कार्यक्रम दाखवित आहे. कुणी शिवचरित्रावर आधारित व्याख्यानमाला सुरू केली आहे तर कुणी भव्य मिरवणुकीची तयारी केली आहे. पण खटावमधील तरुणांनी खास शिवजयंतीनिमित्त डोक्यावरील केसांमध्ये ‘राजे, मर्द मराठा अशी नावे कोरली आहेत.शिवरायांचे फक्त नाव घेतले तरी सर्वाच्या नसानसातून रक्त सळसळते. त्यात तरुणाईचा उत्साह तर अनोखाच असतो. शिवप्रेमी तरुणांकडून शिवजयंती साजरी होत असतानाच यंदा तरुणाईने चक्क महारांची विविध नावे आपल्या डोक्यावर कोरुन महाराजाविषयी असणारे आपले प्रेम व्यक्त केले आहे. काही तरुणांनी डोक्यावर राजे, तर काहींनी मर्द मराठा, महाराज आदी ऐतिहासिक शब्द कोरुन एक वेगळेपण या शिवजयंतीला दाखवून दिले आहे. त्यामुळे सर्वाच्या नजरा या तरुणाईच्या डोक्याकडे न जातील तरच नवल! महिनाभरापासून तयारीज्योत कोठून आणायची, पेहराव कसा करायचा, मिरवणूक कशी काढायची, उपक्रम कोणते राबवायचे याचे नियोजन गेल्या महिनाभरापासून सर्वत्रच सुरू होते. अजिंक्यतारा, रायरेश्वर, प्रतापगड, वर्धनगड, रायगड, सिंधुदुर्ग, अशा किल्ल्यांवरून शिवज्योत आणण्यासाठी तरुण मंडळे रवाना झाली आहेत. खटावमध्ये व्याख्यानमालाखटावमध्ये शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने दि. १५ पासून शिवजयंतीनिमित्त शिव व्याख्यानमाला सुरू करण्यात आली आहे. या व्याख्यानमालेचे दुसरे पुष्प ज्ञानेश पुरंदरे यांनी गुंफले. या वेळी विहिंपचे उत्तम कुदळे, चारुदत्त शेंडे उपस्थित होते. प्रा. किरण जाधव यांनी प्रास्ताविक केले.