सरसंघचालक मोहन भागवत यांचा सोलापुरात मुक्काम; सकाळीच विजयपुराकडे रवाना

By Appasaheb.patil | Updated: July 24, 2023 10:16 IST2023-07-24T10:00:41+5:302023-07-24T10:16:22+5:30

गुरुवार 27 जुलै रोजी ते पुन्हा सोलापुरात येत असल्याचेही सूत्रांनी सांगितले.

Sarsangchalak Mohan Bhagwat's stay in Solapur; Leave for Vijaypura in the morning | सरसंघचालक मोहन भागवत यांचा सोलापुरात मुक्काम; सकाळीच विजयपुराकडे रवाना

सरसंघचालक मोहन भागवत यांचा सोलापुरात मुक्काम; सकाळीच विजयपुराकडे रवाना

आप्पासाहेब पाटील 

सोलापूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांचे रविवारी रात्री उशिरा सोलापुरात आगमन झाले. चौपाड येथील संघ कार्यकर्त्यांच्या घरी ते मुक्कामी राहिले, आज सोमवारी सकाळी दहाच्या सुमारास ते विजयपूरकडे रवाना झाल्याचे सांगण्यात आले.

दरम्यान, सरसंघचालक मोहन भागवत हे दरवर्षी गुरुदेव रानडे यांच्या निंबाळ येथील आश्रमात काही वेळ व्यतीत करण्यासाठी येतात या कार्यक्रमानुसार ते रविवारी रात्री सोलापुरात पावणे अकराच्या सुमारास वंदे भारत एक्सप्रेसने दाखल झाले. त्यांच्या दौऱ्यामुळे सोलापुरात ठीक ठिकाणी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तयार करण्यात आला होता. सकाळी ते सोलापुरातील एका कार्यक्रमाला उपस्थित राहून विजयपूरकडे रवाना होणार असल्याचे संघ कार्यकर्त्यांनी सांगितले होते. गुरुवार 27 जुलै रोजी ते पुन्हा सोलापुरात येत असल्याचेही सूत्रांनी सांगितले.
 

Web Title: Sarsangchalak Mohan Bhagwat's stay in Solapur; Leave for Vijaypura in the morning