सरपंच, ग्रामसेवकासह सदस्यांशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2021 04:24 IST2021-09-26T04:24:20+5:302021-09-26T04:24:20+5:30

ग्रामसुरक्षाबाबत संचालकांचा संवाद लोकमत न्यूज नेटवर्क कुसळंब : ग्रामसुरक्षेबाबत सुरक्षा दलाचे संचालक डी. के. गोरडे यांनी संवाद साधला. तसेच ...

Sarpanch, Gramsevak and other members | सरपंच, ग्रामसेवकासह सदस्यांशी

सरपंच, ग्रामसेवकासह सदस्यांशी

ग्रामसुरक्षाबाबत संचालकांचा संवाद

लोकमत न्यूज नेटवर्क

कुसळंब : ग्रामसुरक्षेबाबत सुरक्षा दलाचे संचालक डी. के. गोरडे यांनी संवाद साधला. तसेच यंत्रणेची प्रात्यक्षिके सादर करण्यात आली.

पांगरी पोलीस ठाणे अंतर्गत असलेल्या पोलीस पाटील, सरपंच, ग्रामसेवक, सुरक्षा दलाचे सदस्य यांची झाडबुके महाविद्यालयात पार पडलेल्या मार्गदर्शन शिबिरात गोरडे यांनी संवाद साधला. या शिबिरात ग्रामंपचायत सदस्य, सरपंच, ग्रामसुरक्षा दलाचे सदस्य उपस्थित होते. व्यासपीठावर पांगरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुधीर तोरडमल, प्राचार्य प्रमोद गिलबिले, पोलीस उपनिरीक्षक प्रदीप शिंदे, पुरी गावचे सरपंच अमर पवार, पिंपळवाडीचे सरपंच जयश्री चौधरी, विलास लांडे उपस्थित होते.

---

फाेटो : २५ गोरडे

सरपंच, सदस्यांशी संवाद साधताना ग्रामसुरक्षा दलाचे संचालक डी. के. गोरडे

Web Title: Sarpanch, Gramsevak and other members