शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

सोलापुरच्या संकल्प युथ फौउंडेशनने ‘एचआयव्ही’बाधितांना मिळवून दिले जीवनाचे जोडीदार

By appasaheb.patil | Updated: December 1, 2018 11:54 IST

संकल्प युथ फाउंडेशनचे कार्य : ‘एचआयव्ही’ग्रस्तांना सन्मान देणारी अजोड विधायकता

ठळक मुद्देएचआयव्ही बाधितांसाठी जनजागृती होत असली तरी समाजाचा दृष्टिकोन पूर्णपणे बदललेला नाहीलहान वयातच जर एचआयव्हीची लागण झाली असेल, तर त्यांना एकट्यानेच आयुष्य कंठणे क्रमप्राप्त होतेवंचित व एचआयव्ही बाधितांसाठी २०१५ साली संकल्प युथ फाउंडेशनची स्थापना

आप्पासाहेब पाटील/  मिलिंद राऊळ सोलापूर : एचआयव्ही बाधितांना  सन्मानाने जगता यावे, एचआयव्ही म्हणजे शेवट नव्हे; एकमेकांच्या साथीने सामान्य माणसांप्रमाणे आयुष्य जगता आले पाहिजे, यासाठी सोलापुरातील संकल्प युथ फाउंडेशनच्या किरण लोंढे यांनी वधू - वर मेळावे, बाधित मुलांना दत्तक घेण्यासह आजपर्यंत विविध उपक्रम हाती घेतले आहेत. 

एचआयव्ही बाधितांसाठी जनजागृती होत असली तरी समाजाचा दृष्टिकोन पूर्णपणे बदललेला नाही. लहान वयातच जर एचआयव्हीची लागण झाली असेल, तर त्यांना एकट्यानेच आयुष्य कंठणे क्रमप्राप्त होते. यामुळेच वधू-वर मेळावा, दत्तक मुले, महिलांच्या आर्थिक उन्नतीसाठी घेतलेला पुढाकार संकल्प युथ फाउंडेशन या संस्थेमुळे एड्सबाधितांना आधार प्राप्त झाला आहे. याबाबत बोलताना किरण लोंढे म्हणाले की, वंचित व एचआयव्ही बाधितांसाठी २०१५ साली संकल्प युथ फाउंडेशनची स्थापना केली. ओंकार साठे, सूरज भोसले, पूजा काटकर, श्रद्धा राऊळ, आकाश धोत्रे, नितेश फुलारी, विजय वाघमोडे आदींच्या सहकार्याने या संस्थेने आजपर्यंत विविध एचआयव्ही बाधितांसाठी विविध उपक्रम हाती घेऊन विधायक काम हाती घेतले़ सुरुवातीला बाधितांसाठी काम करताना अनेक अडचणी आल्या़ त्यानुसार समाजाचा दृष्टिकोन बदलू लागला तशी संस्थेला मदत करणाºयांची संख्या देखील वाढू लागली़ आज संस्थेच्या या सुरू असलेल्या कामाबद्दल सर्व स्तरातून कौतुक केले जात असल्याचेही लोंढे यांनी सांगितले.

वधू-वर मेळाव्याला प्रतिसादसंकल्प युथ फाउंडेशनच्या वतीने १४ फेबु्रवारी २०१८ रोजी एचआयव्ही बाधितांसाठी वधू-वर मेळाव्याचे आयोजन केले होते़ या मेळाव्यात ३० वर्षांखालील १६८ वधू-वर सहभागी झाले होते़ यात महाराष्ट्रासह आंध्रप्रदेश, मध्यप्रदेश, तामिळनाडू आदी राज्यांतील लोक सहभागी झाले होते़ या मेळाव्यात ६ विवाह जमविण्यात आले होत्े. त्यापैकी ३ वधू-वरांचा विवाह संकल्प फाउंडेशनच्या माध्यमातून झाला आहे़ उर्वरित वधू-वरांचा विवाह लवकरच होणार आहे़

५० एचआयव्ही संसर्गित मुले घेतली दत्तकमागील ३ वर्षांपासून संकल्प युथ फाउंडेशनच्या वतीने सोलापूर शहर व परिसरातील ५० एचआयव्ही बाधित मुले दत्तक घेतली आहेत. या मुलांना रोगप्रतिकारकशक्ती वाढविण्यासाठी लागणारा आहार शिक्षणाचा खर्च, आरोग्याची संपूर्ण काळजी नियमित घेण्यात येत आहे़ दत्तक घेताना मुलांमधील रोगप्रतिकारशक्ती २५० सीडीएफ कॉउंट अशी होती, ती आता १५०० झाली आहे़ नियमित न्युट्रेशन दिल्यामुळे या विद्यार्थ्यांमधील प्रतिकारशक्ती वाढीस लागल्याची माहिती किरण लोंढे यांनी दिली.

महिला पुनर्वसनासाठी घेतला पुढाकारशहर व जिल्ह्यातील एचआयव्ही संसर्गित महिला पुनर्वसनाचा वसा संकल्प युथ फाउंडेशनने घेतला. त्यानंतर ३० महिलांसाठी स्वयंपूर्ण बनविण्यासाठी पुढाकार घेतला आहे. या महिलांना प्रशिक्षण, कार्यशाळा, रांगोळी, मेंदी, शिवणकाम आदी  व्यवसाय मिळवून देऊन आर्थिक बाजूने स्वयंपूर्ण बनविण्यासाठी अहोरात्र कार्य या संस्थेच्या माध्यमातून केले जात आहे़ 

संकल्प युथ फाउंडेशनच्या माध्यमातून एचआयव्ही बाधित युवक, युवती, महिला, विद्यार्थी यांच्यासाठी कार्य करीत आहे़ या मुलांना नैराश्य येऊ नये, यासाठी मुख्य काळजी घेतली जाते़ वंचितांबरोबर एचआयव्ही बाधित लोकांसाठीयापुढेही कार्य असेच सुरू राहणार आहे़ - किरण लोंढे, संकल्प युथ फाउंडेशन, सोलापूर.

टॅग्स :SolapurसोलापूरHIV-AIDSएड्सHealthआरोग्यMedicalवैद्यकीय