संभाजी भिडे समर्थकांच्या आंदोलनाला परवानगी नाकारली, कार्यकर्त्यांची धरपकड
By राकेश कदम | Updated: August 2, 2023 17:26 IST2023-08-02T17:26:17+5:302023-08-02T17:26:45+5:30
सोलापूरच्या फौजदार चावडी पोलीस ठाण्यासमोर तणाव

संभाजी भिडे समर्थकांच्या आंदोलनाला परवानगी नाकारली, कार्यकर्त्यांची धरपकड
सोलापूर: शिवप्रतिष्ठानचे प्रमुख संभाजी भिडे यांच्या समर्थनार्थ आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांना फौजदार चावडी पोलिसांनी सोमवारी सायंकाळी पाचच्या सुमाराला ताब्यात घेतले. कार्यकर्त्यांची गर्दी पांगवण्यासाठी सौम्य लाठीमारही केला.
संभाजी भिडे यांच्या समर्थनार्थ छत्रपती शिवाजी महाराज चौकात कार्यकर्त्यांनी दुग्धाभिषेक आंदोलन करण्याचा निर्णय जाहीर केला पोलिसांनी या आंदोलनाला परवानगी नाकारली होती. चौकात जमलेल्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. फौजदार चावडी पोलीस ठाण्यासमोर शिवप्रतिष्ठान आणि भाजप कार्यकर्त्यांची कार्यकर्त्यांची गर्दी जमली होती .या गर्दीला पांगवण्याचा प्रयत्न पोलीस करीत आहेत. कार्यकर्त्यांची घरपकड सुरू आहे.