शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

जिद्दीला सलाम; बाळाचं तोंड पाहण्यासाठी त्या मातेने ‘कोरोना’ ला हरवलं...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2020 12:40 IST

प्रसूतीनंतर एका गोंडस मुलाला जन्म देणारी आई बाळापासून होती दूर; कसेबसे आयसोलेशन वॉर्डात ११ दिवस त्या मातेने काढले

ठळक मुद्देप्रसूतीसाठी शासकीय रुग्णालयात दाखल झाल्यानंतर तिची सर्वप्रथम कोरोना टेस्ट झालीदरम्यान, प्रसूती वेदना सुरू होऊन तिने एका गोंडस मुलाला जन्म दिलाकोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली. त्यानंतर बाळाचीही टेस्ट घेतली. बाळाचा रिझल्ट निगेटिव्ह

बाळकृष्ण दोड्डी

सोलापूर : प्रसूतीसाठी शासकीय रुग्णालयात दाखल झाल्यानंतर तिची सर्वप्रथम कोरोना टेस्ट झाली. दरम्यान, प्रसूती वेदना सुरू होऊन तिने एका गोंडस मुलाला जन्म दिला. त्यानंतर कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली. त्यानंतर बाळाचीही टेस्ट घेतली. बाळाचा रिझल्ट निगेटिव्ह आल्यानंतर बाळाला घरी पाठवले, तर आईला आयसोलेशन वॉर्डात उपचाराकरिता पाठवले. 

आईने कोरोनावर केली मात त्या जिद्दी मातेला रविवारी संध्याकाळी शासकीय रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. जेव्हा ती आई घरी परतली तेव्हा तिच्या बाळाला पाहिल्यानंतर तिने तिच्या आनंदाश्रूंना मोकळी वाट करून दिली. परतल्यानंतर तिने ‘लोकमत’शी संवाद साधला. ती म्हणाली, १२ मे रोजी माझी प्रसुती झाली. मला मुलगा झाला याचा आनंद होताच. सोबत मला आयसोलेशन वॉर्डात घेऊन जाणार, अशी चर्चा डॉक्टरांमध्ये सुरू होती. १३ मे रोजी मला कोरोना झाल्याचे कळले. त्यावेळी सर्वप्रथम मला माझ्या बाळाची चिंता लागून राहिली. लगेच बाळाचीही टेस्ट घेतली. सुदैवाने बाळाची टेस्ट निगेटिव्ह आली. मी थोडी निश्चिंत झाले. पण मनात मोठी धाकधूक लागून राहिली. पुन्हा बाळाकडे जायचे आहे, याच तीव्र इच्छेने मी कोरोनावर तुटून पडले. डॉक्टर जे सांगतील ते करत गेले. अकरा दिवसांत मी कोरोनामुक्त झाले. डॉक्टरांनीही माझे कौतुक केले. 

लोकांनी आम्हाला गुन्हेगार ठरवलं!बाळंतपणासाठी शासकीय रुग्णालयात दाखल झाल्यानंतर मला कोरोना झाल्याचे कळाले. माझे माहेर नीलम नगर येथील असून, सासुरवाडी नवीन विडी घरकूल येथील आहे. माहेर आणि सासरजवळचा परिसर सील करण्यात आला. कोरोना झाल्यानंतर आम्हाला लोकांनी दूर लोटलं. संपर्क तोडला. आमच्या हातून एखादा मोठा गुन्हा घडल्याची भावना आमच्या मनात निर्माण झाली. आम्ही आतून खूप दुखावलो गेलो. पण यातून सुखरूप बाहेर पडू, अशी आशाही होती. कुठल्याही रुग्णाशी अशी वर्तणूक करू नका. कोरोना हा काय महाभयानक रोग नाही. यातून कोणीही बरा होऊ शकतो, असे ती महिला म्हणाली.

टॅग्स :Solapurसोलापूरcorona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस