बार्शीत रक्तदानाने शहिदांना मानवंदना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 04:44 IST2020-12-05T04:44:18+5:302020-12-05T04:44:18+5:30
शहर पोलीस ठाण्यात बुधवारी हे शिबीर झाले. यावेळी पोलीस निरीक्षक संतोष गिरीगोसावी, पोलीस उपनिरीक्षक अमोल ननवरे, गणेश शिंदे ...

बार्शीत रक्तदानाने शहिदांना मानवंदना
शहर पोलीस ठाण्यात बुधवारी हे शिबीर झाले. यावेळी पोलीस निरीक्षक संतोष गिरीगोसावी, पोलीस उपनिरीक्षक अमोल ननवरे, गणेश शिंदे यांच्यासह पोलीस कर्मचारी उपस्थित होते. रक्तपेढीचे चेअरमन शशिकांत जगदाळे म्हणाले, पोलिसांबद्दल आदर आणि कृतज्ञता म्हणून रक्तपेढीने गेल्या चार वर्षांपासून केवळ बार्शीतील पोलीस कर्मचाऱ्यांसाठी मोफत रक्तपुरवठा सुरू केला. पण आता आता शहरापुरते मर्यादित न ठेवता राज्यातील प्रत्येक पोलीस अधिकारी, कर्मचारी व त्यांच्या कुटुंबीयांसाठी रक्तपुरवठा केला जाणार आहे.
फोटो ओळी
०३बार्शी-रक्तदान
बार्शी शहर पोलीस ठाण्यात आयोजित रक्तदान शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी डीवायएसपी अभिजित धाराशिवकर, संतोष गिरीगोसावी, शशिकांत जगदाळे, अमोल ननवरे, गणेश शिंदे आदी.