शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
2
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
3
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
4
पाकमधील हिंदू मुलींचे बळजबरी धर्मांतर रोखा; दानेशकुमार पलानी यांनी उठवला आवाज
5
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
6
धावत्या लोकलमध्ये सशस्त्र हल्ल्यात प्रवाशाचा मृत्यू; कल्याण रेल्वे पोलिसांनी दोघांना केली अटक
7
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
8
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
9
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
10
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
11
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
12
मनसेच्या अविनाश जाधवांवर गुन्हा दाखल; पाच कोटींच्या वसुलीसाठी सोन्याच्या दागिन्यांचे व्यापारी जैन यांना धमकावल्याचा आरोप
13
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
14
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला
15
जातिवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या, कोपर्डी घटनेतील पीडितेच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा
16
रस्ता बांधल्यावरुन चीनला भारताने चांगलेच खडसावले; शक्सगाम खोरे हा आमचा भाग, केला दावा
17
सूर्यापेक्षा दीडपट दूरवरुन आला पृथ्वीवर सिग्नल; नासाच्या ‘सायके’ यानाची यशस्वी कामगिरी
18
भूषण पाटील दहा कोटींचे धनी; मालमत्तेत साडेसहा कोटींची वाढ
19
श्रीकांत शिंदेंकडे ७.५ कोटींची संपत्ती; वाहने नाहीत, सातारा जिल्ह्यात शेती
20
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?

ग्रामीण भागातही पसरु लागले संक्रमणाचे लोण;गावागावात चौकशीसाठी खणखणू लागले फोन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2020 2:18 PM

कोरोनाची भीती वाढली: पंढरपूर तालुक्यात पाच, माळशिरस, अक्कलकोटमध्ये प्रत्येकी दोन रुग्ण वाढले; बार्शीत दहा जणांचे घेतले स्वॅब

ठळक मुद्देसंग्रामनगर (ता. माळशिरस) येथील किराणा होलसेल व्यापाºयाच्या पत्नी व मुलाचा कोरोना संसर्ग तपासणी अहवाल आज पॉझिटिव्हजामगाव येथील एक रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह (सारी) निघाल्यानंतर प्रशासन खडबडून जागे झालेजामगावला प्रतिबंधित क्षेत्र घोषित करून गावच्या सीमा सील करण्यात आल्या

सोलापूर: गेल्या काही दिवसांपासून सातत्याने सोलापुरात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढते आहे. आता त्याचे लोण गावोगावी पोहोचू लागले आहे. बुधवारी आरोग्य विभागाकडून केलेल्या तपासणीमध्ये पंढरपूर शहरात दोन तर तालुक्यातील उपरीत १, गोपाळपूर १,  करकंब १ असे एकूण ५, माळशिरस तालुक्यातील अकलूज २, अक्कलकोट शहरामध्ये २ आणि दक्षिण सोलापूर तालुक्यातील बोरामणी येथे १ अशा दहा जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. दरम्यान, बार्शी तालुक्यातील दहा जणांचे स्वॅब तपासणीसाठी सोलापूरला पाठवले आहेत. गावोगावी खबरदारीच्या उपाययोजनांसाठी आरोग्य प्रशाासन सतर्क झाले आहे. कोरोनाचे हे लोण आता जिल्ह्यात पोहोचू लागले आहे. चिंतेपोटी गावागावातून आपल्या पै-पाहुण्यांना चौकशीसाठी फोन खणखणू लागले आहेत.

अकलूज परिसरात बफर क्षेत्र घोषितअकलूज : संग्रामनगर (ता. माळशिरस) येथील किराणा होलसेल व्यापाºयाच्या पत्नी व मुलाचा कोरोना संसर्ग तपासणी अहवाल आज पॉझिटिव्ह आल्याने अकलूजसह संग्रामनगर परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. यामुळे अकलूज, संग्रामनगर ग्रामपंचायतीने सतर्कता बाळगत परिसरात निर्जंतुकीकरणाची फवारणी केली आहे. तर महसूल प्रशासनाने संग्रामनगरातील भाग प्रतिबंधित क्षेत्र तसेच बफर क्षेत्र म्हणून घोषित केला आहे. आरोग्य यंत्रणा या पार्श्वभूमीवर गतिमान झाली आहे. संक्रमित व्यक्तीच्या कुटुंबातील चार व्यक्तींसह घरकाम करणाºया दोन महिला, दूधवाला, दोन कामगार, हमाल, वाहनचालक असे ११ जणांचे स्वॅब तपासणीसाठी अकलूज येथील उपजिल्हा रुग्णालयात घेण्यात आले आहेत.

बार्शी तालुक्यात आणखी दहा जणांचे घेतले स्वॅबबार्शी: मंगळवारी रात्रीच्या अहवालामध्ये तालुक्यातील जामगाव येथील एक रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह (सारी) निघाल्यानंतर प्रशासन खडबडून जागे झाले़ बुधवारी जामगावच्या चार, वैरागचे तीन आणि बार्शी शहरातील तीन अशा दहा जणांचे स्वॅब घेण्यात आले. दरम्यान, जामगावला प्रतिबंधित क्षेत्र घोषित करून गावच्या सीमा सील करण्यात आल्या आहेत. नागरिकांच्या तपासणीसाठी आरोग्य विभागाची दहा पथके तयार केल्याची माहिती तहसीलदार प्रदीप शेलार यांनी दिली़ 

दक्षिण तालुक्यातील सात गावे बफर झोन सोलापूर : बोरामणी येथे कोरोनाचा रुग्ण आढळून आल्याने प्रशासकीय यंत्रणा खडबडून जागी झाली आहे. पॉझिटिव्ह रुग्ण वास्तव्यास असलेल्या गल्लीसह आजूबाजूचा परिसर प्रतिबंधित क्षेत्र घोषित करण्यात आला आहे. दक्षिण सोलापूर तालुक्यातील पहिला कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण बोरामणी येथे आढळून आला आहे. हा रुग्ण पोलीस कर्मचारी असून, त्याला दोन दिवसांपूर्वी त्रास जाणवू लागला. त्यामुळे त्याला कुंभारीच्या अश्विनी ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. त्याच्या स्वॅब चाचणीचा अहवाल आज बुधवारी प्राप्त झाला. त्यात तो पॉझिटिव्ह निघाला़

अक्कलकोटमध्ये कोरोनाचे आणखी आढळले दोन रुग्ण अक्कलकोट : शहरात कोरोनाचे रुग्ण आढळताच मंगळवारी घेण्यात आलेल्या ४१ स्वॅबपैकी दोघांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत़ उर्वरित ३६ अहवाल हे निगेटिव्ह तर ३ जणांचे अहवाल अद्यापही प्रलंबित असल्याची माहिती तहसीलदार अंजली मरोड यांनी दिली. आता अक्कलकोटकरांची चिंता वाढली आहे.

टॅग्स :Solapurसोलापूरcorona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस