सालसे: टँकरच्या धडकेने मोटरसायकलस्वार ठार
By Admin | Updated: July 10, 2014 01:13 IST2014-07-10T01:13:27+5:302014-07-10T01:13:27+5:30
युवक जागीच मरण पावला़

सालसे: टँकरच्या धडकेने मोटरसायकलस्वार ठार
करमाळा : दुधाच्या टँकरने मोटरसायकलस्वारास जोरदार धडक मारल्याने विनोद धर्मराज बदे (वय-२७) हा युवक जागीच मरण पावला़ ही दुर्घटना बुधवारी सकाळी सालसे रस्त्यावर सातपुते वस्तीसमोर घडली़
तालुक्यातील उम्रड येथील विनोद आपल्या बहिणीकडे गौंडरे येथे गेला होता. गौंडरेहून परतत असतांना सालसेजवळ त्याच्या मोटारसायकलला (एम.एच.४५/व्ही-६५७१) समोरून भरधाव येणाऱ्या दूध टँकरने (एम.एच.१२/इएफ-९८४४) जोरदार धडक दिली़अपघातानंतर टँकरचालक घटना स्थळावरून पसार होण्यात यशस्वी झाला़ या अपघाताची खबर संदीप बाळू बदे याने दिली़