कोर्टात दावा दाखल केल्याने सख्ख्या भाऊ-भावजयीला मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2021 04:21 IST2021-07-26T04:21:57+5:302021-07-26T04:21:57+5:30

चिकमहूद येथील शिवाजी मच्छिंद्र भोसले १७ जुलै रोजी रात्री ९ वाजेच्या सुमारास घरी असताना थोरला भाऊ जगन्नाथ भोसले व ...

Sakhya's brother-in-law beaten for filing suit in court | कोर्टात दावा दाखल केल्याने सख्ख्या भाऊ-भावजयीला मारहाण

कोर्टात दावा दाखल केल्याने सख्ख्या भाऊ-भावजयीला मारहाण

चिकमहूद येथील शिवाजी मच्छिंद्र भोसले १७ जुलै रोजी रात्री ९ वाजेच्या सुमारास घरी असताना थोरला भाऊ जगन्नाथ भोसले व श्रीमंत भोसले हे त्यांच्या घरासमोर आले. दरम्यान, वडिलोपार्जित जमीन मिळावी म्हणून शिवाजी भोसले यांनी कोर्टात दावा दाखल केला होता. पूर्ण जमीन ही त्यांच्याच नावावर आहे. असे असतानाही शिवाजी भोसले व श्रीमंत भोसले यांनी तू कोर्टात दावा दाखल का केला, तुझा या जमिनीत काहीही संबंध नाही, असे म्हणून भाऊ शिवाजी यास शिवीगाळ, दमदाटी करून लाथाबुक्क्यांनी, लोखंडी गजाने डोक्यात, हातावर, छाती, मनगटावर मारहाण केली. यावेळी शिवाजीची पत्नी सविता भांडण सोडण्यासाठी आली असता तिलाही काठीने मारहाण करून जखमी केले. याबाबत शिवाजी भोसले यांनी फिर्याद दाखल केली असून, पोलिसांनी दोघांवर गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: Sakhya's brother-in-law beaten for filing suit in court