बांधाच्या कारणावरून सख्या भावावर खुरप्याने वार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:27 IST2021-07-07T04:27:38+5:302021-07-07T04:27:38+5:30

वैराग : शेतातील बांधाच्या कारणावरून घाणेगाव येथे सख्ख्या भावाने खुरप्याने डोळ्याच्या बाजूला वार करून जखमी केल्याची घटना बार्शी तालुक्यात ...

Sakhya Bhav was hit with a hoe due to the dam | बांधाच्या कारणावरून सख्या भावावर खुरप्याने वार

बांधाच्या कारणावरून सख्या भावावर खुरप्याने वार

वैराग : शेतातील बांधाच्या कारणावरून घाणेगाव येथे सख्ख्या भावाने खुरप्याने डोळ्याच्या बाजूला वार करून जखमी केल्याची घटना बार्शी तालुक्यात घाणेगाव येथे घडली.

पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार शनिवारी दुपारी साडेतीन वाजता ही घटना घडली. याबाबत फिर्यादी नानासाहेब दत्तू राऊत (रा. घाणेगाव, ता. बार्शी ) यांनी फिर्याद दिली आहे. ते स्वत:च्या शेतामध्ये सोयाबीन पिकावर फवारणी करून नदीकडे निघाले होते. शेजारील भाऊ हनुमंत हा शेतातील बांधाच्या ठिकाणी खुरपे घेऊन आला. माझी शेती तुझ्या बांधाच्या आतमध्ये येते. तू मला शेती सोडून दे म्हणत भांडण काढले. यातून वाद विकोपाला गेला आणि अंगावर धाऊन जाऊन हातातील खुरप्याने डाव्या डोळ्या जवळ मारून जखमी केले. याप्रकरणी वैराग पोलिसांनी हनुमंत दत्तू राऊत याच्या विरुद्ध गुन्हा नोंदला आहे.

----

Web Title: Sakhya Bhav was hit with a hoe due to the dam