शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

कार्तिकीच्या अनुपम्य सोहळ्यासाठी सजली पंढरी; २०० दिंड्या दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2021 07:06 IST

एसटी कर्मचाऱ्यांचा संप असला तरी सावळ्या विठुरायाच्या दर्शनाची आस मनी ठेवून सुमारे लाखभर भाविक दाखल झाले असून, त्यांना पवित्र चंद्रभागेत स्नान करता यावे, यासाठी प्रशासनाने नदीत पाणी सोडले आहे

ठळक मुद्देएसटी कर्मचाऱ्यांचा संप असला तरी सावळ्या विठुरायाच्या दर्शनाची आस मनी ठेवून सुमारे लाखभर भाविक दाखल झाले असून, त्यांना पवित्र चंद्रभागेत स्नान करता यावे, यासाठी प्रशासनाने नदीत पाणी सोडले आहे.

पंढरपूर (जि. सोलापूर) : ‘आषाढी कार्तिकी विसरु नका मज’ अशी भक्तांकडे विनवणी करणाऱ्या सावळ्या विठुरायाच्या भेटीसाठी आसुसलेल्या भक्तांना तब्बल दोन वर्षानी तो योग आला आहे. भूवैकुंठ पंढरीत सोमवारी होणाऱ्या कार्तिकी एकादशीच्या आनंदमयी, अनुपम सोहळ्यासाठी भाविकांचे डोळे आसुसलेले असून सोहळ्यासाठी पंढरी  नगरी सज्ज झाली आहे.  सुमारे २०० दिंड्यांसह  लाखभर भाविक दाखल झाले आहेत.

एसटी कर्मचाऱ्यांचा संप असला तरी सावळ्या विठुरायाच्या दर्शनाची आस मनी ठेवून सुमारे लाखभर भाविक दाखल झाले असून, त्यांना पवित्र चंद्रभागेत स्नान करता यावे, यासाठी प्रशासनाने नदीत पाणी सोडले आहे. त्यामध्ये वारकरी मनसोक्त स्नानाचा आनंद घेताना दिसत आहेत. कार्तिकी सोहळ्याच्यानिमित्ताने पंढरपूरकडे येणाऱ्या प्रमुख मार्गांवर गेल्या दोन वर्षांत प्रथमच टाळमृदंगासह विठुनामाचा जयघोष ऐकू येत आहे. पंढरपुरातील विविध मार्गावर डोक्यावर तुळस घेतलेल्या महिला, विणेकरी, टाळमृदंगाचा गजर करणारे दिंडीकरी असे चैतन्यमय दृष्य पहायला मिळत आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे भाविकांची संख्या कमी असली तरी खासगी वाहने, ट्रॅव्हल्सच्या बसेसनी रविवारी सायंकाळपर्यंत बऱ्यापैकी भाविकांची दाटी पंढरपुरात झाली आहे. मठामठामध्ये चैतन्य फुलले असून कार्तिकीची लगबग सर्वत्र दिसत आहे. 

व्यापारी पेठा गजबजल्यावारीच्या निमित्ताने व्यावसायिकही मोठ्या प्रमाणात दाखल झाले असून नवीपेठ, संत पेठ, चौफाळा, भक्तीमार्ग परिसरात लहानमोठ्या व्यापाऱ्यांनी दुकाने थाटल्याने वारीचे वैभव अनुभवायला मिळत आहे. खेळणी, प्रासादिक साहित्य यासह प्रापंचिक वस्तूंचीही रेलचेल झाली आहे. वाहनांना नो एन्ट्री

शहरातील प्रमुख रस्त्यांवरून फिरताना भाविकांना त्रास होऊ नये, यासाठी नगर परिषद प्रशासनाने मुख्य रस्त्याकडे जाणाऱ्या रस्त्याला बॅरिकेड लावून वाहनांना बंदी केली आहे. यामध्ये सावरकर चौक ते शिवाजी चौक, प्रदक्षिणा मार्गाचा सहभाग आहे. nस्टेशन रोडकडे जाणाऱ्या अंतर्गत रस्त्यावर दुचाकी व चारचाकी वाहनांना ये-जा करण्यास बंदी करण्यात आली आहे. स्टेशन रोडला मिळणाऱ्या रस्त्यावर लोखंडी बॅरिकेड लावण्यात आले आहेत. 

टॅग्स :PandharpurपंढरपूरSolapurसोलापूर