शहरं
Join us  
Trending Stories
1
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
2
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
3
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
4
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
5
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
6
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
7
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
8
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
9
AUS vs IND : वैभव सूर्यवंशीचा ऑस्ट्रेलियात धमाका; हा फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी!
10
'महानायक' मोहनलाल; एका वर्षात दिले २५ ब्लॉकबस्टर चित्रपट, ५ वेळा मिळाला राष्ट्रीय पुरस्कार
11
भारताच्या शेजारील देश भूकंपाने हादरला; म्यानमारमध्ये ४.० तीव्रतेचा भूकंप, भारतावरही परिणाम?
12
शेअर्स आहे की पैशांचा पाऊस? 'या' ५ स्टॉक्सनी एकाच आठवड्यात दिले तब्बल ५५% रिटर्न!
13
१६ कोटींचा बंगला, चॉपर, दुबईच्या कंपनीत ३८ कोटी... ईडीच्या कारवाईत मोठं घबाड हाती, पोलिसांना कल्पनाच नाही
14
कोरोनापासून जगाला सावध करणाऱ्या चिनी पत्रकाराला पुन्हा तुरुंगवास; आधीच चार वर्षे भोगली शिक्षा..., आता पुन्हा
15
गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला, आंदोलकांनी ताफा अडवल्याने उडाला गोंधळ; पोलिसांची धावपळ
16
YouTube वरून पैसे कमवायचे आहेत? मग ‘या’ महत्त्वाच्या अटी पूर्ण करा, लगेच सुरू होईल कमाई!
17
शुबमन गिल प्लेईंग ११ बाहेर बसणार, संजू सॅमसनला संधी? भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी मोठा बदल होण्याची शक्यता...
18
भारत-पाकिस्तान सामन्याच्या दिवशीच एकनाथ शिंदेंचे X अकाऊंट हॅक; राजकीय वर्तुळात खळबळ
19
आधार कार्डबाबतची 'ही' चूक केल्यास १० वर्षांचा तुरुंगवास! यूआयडीएआयने जारी केले कठोर नियम
20
Viral Video : चीनला पोहोचलेल्या भारतीय व्यक्तीने दाखवलं असं काही की पाहणारेही झाले थक्क! तुम्हीही कमाल बघाच

सोलापुरात मधमाश्यांच्या पोळ्याचे शहरातून जंगलात सुरक्षित पुनर्वसन

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2021 08:39 IST

लटकलेल्या मधमाश्यांच्या पोळ्याला हात लावणे म्हणजे धाडसाचेच काम आहे. शहरी भागातून अशा पोळ्याला काढून नैसर्गिक विहारात पुनर्स्थापित करण्यात  सोलापूरच्या नेचर कॉन्झर्व्हेशन सर्कलच्या सदस्यांना यश आले. 

सोलापूर : लटकलेल्या मधमाश्यांच्या पोळ्याला हात लावणे म्हणजे धाडसाचेच काम आहे. शहरी भागातून अशा पोळ्याला काढून नैसर्गिक विहारात पुनर्स्थापित करण्यात  सोलापूरच्या नेचर कॉन्झर्व्हेशन सर्कलच्या सदस्यांना यश आले. सोलापूर शहरातील उद्योजक पूर्णचंद्र राव यांच्या घरी बांधकाम चालू होते. त्यांच्या घरामध्ये तिसऱ्या मजल्यावर मधमाश्यांचे पोळे असल्याने बांधकामाला अडचण आली होती. ही माहिती नेचर कॉन्झर्वेशनच्या सदस्यांना मिळाल्यावर ते तिथे पोहोचले. पुठ्ठ्याचा बॉक्स, सनमाइकचा तुकडा, लोखंडी सळई व पेपर टेप इत्यादी वस्तूंचा वापर केला. छताला लागलेल्या पोळ्याला छतापासून अलगद पुठ्ठ्याच्या बॉक्समध्ये उतरवले आणि झाकून टाकले. आतमध्ये हवा जाण्यासाठी बॉक्सला बारीक छिद्रे केली. तत्काळ तो बॉक्स अलगद उचलून उपवनसंरक्षक धैर्यशील पाटील यांच्या परवानगीने व वनपरिमंडल अधिकारी शंकर कुताटे यांच्या सहकार्याने सिद्धेश्वर वनविहार या राखीव वनक्षेत्रात असलेल्या बांबूच्या झोपडीत थंड ठिकाणी मधमाश्या शांत होण्याकरिता रात्रभर तसाच ठेवण्यात आला.मधमाश्यांनी शोधली नवी जागादुसऱ्या दिवशी वन विहारात असलेल्या उंच पाण्याच्या टाकीखाली थंड ठिकाणी तो पोळा असलेला बॉक्स हलविण्यात आला. काही वेळाने त्यातल्या १५ ते २० मधमाश्या बाहेर आल्या व घोंगावत परिसराचा अंदाज घेऊ लागल्या. एक दिवसानंतर तिथे जाऊन पाहणी केली असता, बॉक्समध्ये एकही मधमाशी नव्हती. बॉक्स ठेवल्याच्या पन्नास मीटर अंतरावर एका उंच झाडाच्या फांदीला या मधमाश्यांनी नव्या पोळ्याची बांधणी सुरू केली होती.  

मधमाश्यांना पाहून अनेक लोक घाबरतात. त्यामुळे या मधमाश्यांच्या पोळ्यांना जाळलं तरी जातं किंवा केमिकल टाकून मारलं जातं; पण जैवविविधतेत महत्त्वाचा भाग असणाऱ्या या मधमाश्यांचा बचाव होताना दिसत नाही, तरीही अनुभव नसताना ही कामगिरी पार पाडली.- भरत छेडा,  मानद वन्यजीव रक्षक, एनसीसीएस

टॅग्स :wildlifeवन्यजीवSolapurसोलापूर