जाधववाडीत सद्‌गुरु पॅनलचे वर्चस्व कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2021 04:22 IST2021-01-25T04:22:39+5:302021-01-25T04:22:39+5:30

या निवडणुकीत विजयी पॅनलचे गणेश महाडिक यांच्याविरोधात माढा तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मोहन मोरे यांच्यासह माढा तालुका ...

Sadhguru panel dominates in Jadhavwadi | जाधववाडीत सद्‌गुरु पॅनलचे वर्चस्व कायम

जाधववाडीत सद्‌गुरु पॅनलचे वर्चस्व कायम

या निवडणुकीत विजयी पॅनलचे गणेश महाडिक यांच्याविरोधात माढा तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मोहन मोरे यांच्यासह माढा तालुका काँग्रेसचे अध्यक्ष सौदागर जाधव, माजी सरपंच तानाजी जाधव यांनी एकत्र येऊन महाविकास आघाडीचे पॅनल तयार करून नऊ जागा लढवल्या होत्या. मात्र, त्यांना तीन जागांवरच समाधान मानावे लागले.

सद्गुरु पॅनलचे प्रभाग क्रमांक २ मधून जयश्री रावसाहेब महाडिक, बालाजी सुर्वे, संगीता वसंत माळी, प्रभाग क्रमांक ३ मधून विष्णू घोलप, सुमन सुर्वे, पूजा बिनगे हे सहा उमेदवार विजयी झाले आहेत तर महाविकास आघाडीचे विलास जाधव, अनिता जालिंदर चव्हाण व नीता राहुल जाधव हे तीन उमेदवार विजयी झाले आहेत. महाडिक गटाचे नऊपैकी सहा उमेदवार विजयी झाल्याने माजी सरपंच गणेश महाडिक यांच्या गटाला बहुमत मिळाले आहे.

----२३मोडनिंब-जाधववाडी

----

Web Title: Sadhguru panel dominates in Jadhavwadi