मिनी बँकेच्या मदतनीस यांच्या दुचाकीच्या डिक्कीतून १ लाख रुपये लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2021 04:26 IST2021-03-01T04:26:02+5:302021-03-01T04:26:02+5:30

मेडशिंगी येथील भीमाशंकर लेंडवे हे बँक ऑफ इंडियाअंतर्गत मिनी शाखा चालवितात. त्यांना सांगोल्यातील सूर्योदय अर्बन बँकेत पैसे भरावयाचे असल्याने ...

Rs 1 lakh from the trunk of a mini bank assistant's two-wheeler | मिनी बँकेच्या मदतनीस यांच्या दुचाकीच्या डिक्कीतून १ लाख रुपये लंपास

मिनी बँकेच्या मदतनीस यांच्या दुचाकीच्या डिक्कीतून १ लाख रुपये लंपास

मेडशिंगी येथील भीमाशंकर लेंडवे हे बँक ऑफ इंडियाअंतर्गत मिनी शाखा चालवितात. त्यांना सांगोल्यातील सूर्योदय अर्बन बँकेत पैसे भरावयाचे असल्याने १ लाख २५ हजार रुपये त्यांच्या एमएच ४५/एम ०५११ या दुचाकीच्या डिक्कीत ठेवून दुचाकी सांगोला येथील बँक ऑफ इंडिया समोर उभी करून ते कामानिमित्त बँकेत गेले. यानंतर दु. २च्या सुमारास मित्र कुबेर इंगोले यास २५ हजार रुपये देऊन उर्वरित १ लाख रुपये डिक्कीत ठेवून लाॅक केली होती. दरम्यान, दु. ३.४५ च्या सुमारास सूर्योदय अर्बन बँकेत पैसे देण्याकरिता जायचे असल्याने ते बँकेतून बाहेर आले. यावेळी डिक्कीचे कुलूप उचकटलेले दिसून आले. त्यांनी डिक्की उघडून पाहिली असता १ लाख रुपये गायब होते. या प्रकाराबाबत त्यांनी मित्र कुबेर इंगोले यास सांगून विचारपूस केली. त्याने मला काही माहीत नसल्याचे सांगितले.

Web Title: Rs 1 lakh from the trunk of a mini bank assistant's two-wheeler