ट्रॅक्टरच्या रोटरनं ब्लँकेटसह चालकाही खेचलं, गंभीर जखमी होऊन जागीच ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2021 04:42 IST2021-02-21T04:42:25+5:302021-02-21T04:42:25+5:30
शेतामध्ये टॅक्टरला रोटर जोडून ते मारत असताना अंगावर झाकण्यासाठी ठेवलेली ब्लेंकेट रोटरमध्ये अडकली. तीच ब्लँकेट चालकाने लपटली असल्याने ...

ट्रॅक्टरच्या रोटरनं ब्लँकेटसह चालकाही खेचलं, गंभीर जखमी होऊन जागीच ठार
शेतामध्ये टॅक्टरला रोटर जोडून ते मारत असताना अंगावर झाकण्यासाठी ठेवलेली ब्लेंकेट रोटरमध्ये अडकली. तीच ब्लँकेट चालकाने लपटली असल्याने रोटरने ब्लँकेटसह चालकालाही खेचले. त्यात गंभीर जखमी होऊन चालकाचा मृत्यू झाला. ही दुर्देवी घटना १९ फेब्रुवारी रोजी रात्री ११ वाजण्याच्या लांबोटी ता. मोहोळ येथे घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुळूज ता. पंढरपूर येथील सचिन लक्ष्मण खरात हा लांबोटी येथे बजरंग करे यांच्या शेतामध्ये टॅक्टर घेऊन रोटर मारण्यासाठी १९ फेब्रुवारी रोजी आला होता.
रात्री ११ वा. दरम्यान रोटर मारण्याचे काम करीत असताना अचानक ब्लॅंकेट रोटरमध्ये अडकून सचिनही पाठीमागे रोटरमध्ये खेचला गेला. त्यांच्या डोक्याला, पायाला गंभीर दुखापत होऊन जागीच मृत्यु झाला.
टॅक्टर वाकडा तिकडा चालल्याने जवळच बसलेले आण्णा महादेव कुंभार हे तेथे गेले असता सचिन हा ट्रॅक्टर आणि रोटरच्या जॉईटमध्ये पडून गंभीर जखमी झाल्याचे लक्षात आले. या प्रकरणी प्रदीप भारत खरात रा. पुळूज यांनी मोहोळ पोलिसात खबर दिली असून पुढील तपास सहा. पोलीस निरीक्षक शेलार हे करीत आहेत.