कामती येथे रस्ता सुरक्षा अभियान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2021 04:27 IST2021-02-17T04:27:41+5:302021-02-17T04:27:41+5:30

कामती : मोहोळ तालुक्यातील कामती बुद्रुक येथे दिलीप बिल्डकॉन व कामती पोलीस ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने ३२ वे ...

Road safety campaign at Kamati | कामती येथे रस्ता सुरक्षा अभियान

कामती येथे रस्ता सुरक्षा अभियान

कामती : मोहोळ तालुक्यातील कामती बुद्रुक येथे दिलीप बिल्डकॉन व कामती पोलीस ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने ३२ वे रस्ता सुरक्षा अभियान पार पडले.

संपूर्ण देशभरात १८ जानेवारी ते १७ फेब्रुवारी या मासिकात या अभियानाची सुरुवात केली जाते.

या अभियानांतर्गत वाहन धारकांना दारू पिऊन ड्रायव्हिंग करू नये, हेल्मेट वापरणे, गती प्रमाणात ठेवणे, डाव्या व उजव्या बाजूला पाहून गाडी चालवणे, कमी वयात वाहन न चालवणे, ओव्हरटेक करू नये आशा विविध नियमाचे सांगून जनजागृती करण्यात आली.

यावेळी कामती पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक अंकुश माने, पोलीस उपनिरीक्षक सुनील खटके, पोलीस हेड कॉन्स्टेबल अमोल नायकोडे, नागराज कुंभार, डीबीएलचे प्रकल्प अधिकारी प्रदीप कुमार सिंग, अभिषेक दुबे, सुरक्षा अधिकारी मुखतीयार सिंग, प्रकाश पारवे, शंकर पाटील उपस्थित होते.

Web Title: Road safety campaign at Kamati