शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

सांगोला, बार्शी, मोहोळमध्ये रास्ता रोको, माढ्यात टायर जाळले, अकलूजमध्ये चप्पल मारो आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2020 13:20 IST

मराठा आरक्षणप्रश्नी सोलापूर बंद; मोहोळ, अक्कलकोट, मंगळवेढा, पंढरपुरात कडकडीत बंद

ठळक मुद्देसांगोल्यात सकल मराठा समाजाच्यावतीने मिरज रेल्वे गेटवर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले़बार्शी तालुक्यातील पानगाव येथे लहान मुलांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या मुर्ती पुष्पहार अर्पण करीत आंदोलन करण्यात आले

सोलापूर : मराठा समाजाला आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयात स्थगिती मिळाल्याने मराठा समाज प्रचंड आक्रमक झाला आहे़ आरक्षणासाठी सोलापूर जिल्हा बंद ची हाक दिल्याने या बंद ला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला असून संबंध जिल्ह्यात  याचा परिणाम पहायला मिळत आहे. 

दरम्यान, या सोलापूर जिल्हा बंद आंदोलनाला सकाळी पाच वाजल्यापासून सुरुवात झाली़ माढा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात टायर पेटवून देत आरक्षण स्थगिती निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या़ आरक्षण मिळाले पाहिजे ही भूमिका स्पष्ट करत कुर्डूवाडीत कडकडीत बंद पाळण्यात आला तर या बंदमध्ये फक्त सर्व दवाखाने व्यतिरिक्त सर्व सुविधा बंद ठेवण्यात आल्याने मोठा प्रतिसाद पहायला मिळाला. सांगोल्यात सकल मराठा समाजाच्यावतीने मिरज रेल्वे गेटवर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले़ करमाळ्यात कडकडीत बंद पाळण्यात आला होता़ यावेळी तहसिलदार, पोलिसांना निवेदन देण्यात आले़ टेंभुर्णीत बंद पाळण्यात आला होता़ कुसळंब चौकात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

या बंदचे ग्रामीण भागात लोण पोहोचले असून ठिकठिकाणी रस्त्यावर येऊन सकल मराठा समाज्याच्यावतीने आंदोलन करण्यात आले. यावेळी कुर्डूवाडी येथे पंराडा चौकात चक्क जाम करीत अंदोलन करण्यात आले तर शहरातील व्यावसायिकांनी बंद ठेवून मराठा समाज्याच्या भूमिकेला पाठिंबा दिला. तर बार्शी तालुक्यातील पानगाव येथे लहान मुलांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या मुर्ती पुष्पहार अर्पण करीत आंदोलन करण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने समाज बांधव रस्त्यावर उतरले होते. 

टॅग्स :SolapurसोलापूरmarathaमराठाMaratha Reservationमराठा आरक्षणStrikeसंप