अक्षता सोहळ्यासाठी नदीध्वज रवाना
By Admin | Updated: January 13, 2017 10:43 IST2017-01-13T10:43:07+5:302017-01-13T10:43:07+5:30
सिध्देश्वर यात्रेतील सर्वात मोठा विधी असणा-या अक्षता सोहळ्यासाठी सातही नंदीध्वज सिध्देश्वर मंदिरातील संकती कट्ट्याकडे रवाना झाले.

अक्षता सोहळ्यासाठी नदीध्वज रवाना
>ऑनलाइन लोकमत
सोलापूर, दि.१३ - सिध्देश्वर यात्रेतील सर्वात मोठा विधी असणा-या अक्षता सोहळ्यासाठी सातही नंदीध्वज सिध्देश्वर मंदिरातील संकती कट्ट्याकडे रवाना झाले.
सकाळी सातच्या सुमारास यात्रेचे मानकरी हिरेहब्बू वाड्यात नंदीध्वज आणि पालखीतील सिध्देश्वरांच्या मुर्तीची विधीवत पूजा झाली व मिरवणुकीला सुरवात झाली. सर्वात पुढे पंचरंगी ध्वज त्यानंतर मानकरी त्यापाठीमागे पालखी आणि शेवटी एकामागे एक आभाळापर्यंत उंचच उंच नंदीध्वज निघाल्यावर त्यांचा दर्शनासाठी सोलापूर वासीयानी गर्दी केली.
ठिकठिकानी नंदीध्वज थांबवून त्याला खारीक खोबर्याचे हार बांधून ओवाळणी करण्यात येत होते.त्यामुळे मिरवणुक अतिशय संत गतीने मार्गस्थ होत होती. संस्कारभारतीच्या वतीने नंदीध्वजाच्या स्वागतासाठी रांगोळीच्या पायघड्या घालण्यात आल्या होत्या. त्यामुळे वातावरण भारावून गेले होते. दुपारी एक वाजता सन्मती कट्ट्यावर अक्षतेसाठी नदीध्वज पोचतील.