वाकावच्या सरपंचपदी ऋतुराज सावंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2021 04:26 AM2021-03-01T04:26:37+5:302021-03-01T04:26:37+5:30

माढा : वाकाव ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी ऋतुराज शिवाजी सावंत यांची, तर उपसरपंचपदी प्रियंका कदम यांची बिनविरोध निवड झाली. ऋतुराज सावंत ...

Rituraj Sawant as the Sarpanch of Wakav | वाकावच्या सरपंचपदी ऋतुराज सावंत

वाकावच्या सरपंचपदी ऋतुराज सावंत

Next

माढा : वाकाव ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी ऋतुराज शिवाजी सावंत यांची, तर उपसरपंचपदी प्रियंका कदम यांची बिनविरोध निवड झाली. ऋतुराज सावंत यांनी पहिल्यांदाच ग्रामपंचायत निवडणूक लढविली आणि पहिले युवा सरपंच होण्याचा मान मिळविला. सरपंच, उपसरपंच निवडीनंतर कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करीत जल्लोष केला.

निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून एस.टी. सुर्वे, मंगेश वाळके, एस. एस. कांबळे व ग्रामविकास अधिकारी टी.एल. मोहिते उपस्थित होते. सरपंचपदासाठी ऋतुराज सावंत व उपसरपंचपदासाठी प्रियांका कदम यांचे एकमेव अर्ज दाखल झाले होते. यावेळी ग्रामपंचायत सदस्य कीर्ती बोधले, राधाबाई सावंत, धनश्री कोकाटे, अनुसया कुंभार, बजरंग गोसावी, माणकोजी भुसारे, भारत खंडागळे उपस्थित होते.

वाकाव ग्रामपंचायतच्या सरपंचपदाचे आरक्षण सर्वसाधारण पुरुष वर्गासाठी आरक्षित झाले आहे. नूतन सरपंच ऋतुराज सावंत व उपसरपंच प्रियंका कदम यांचे शिवसेनेचे जिल्हा समन्वयक प्रा. शिवाजीराव सावंत, भैरवनाथ शुगरचे व्हाइस चेअरमन अनिल सावंत, माजी पंचायत समिती सदस्य पृथ्वीराज सावंत, ॲड केशव सावंत, संजय ढेरे, नाना शेलार, गणेश पवार, किरण कोकाटे, शाहू कोकाटे, अजिंक्य काटे यांनी कौतुक केले.

---

२८ ऋतुराज सावंत

२८ प्रियांका कदम

Web Title: Rituraj Sawant as the Sarpanch of Wakav

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.