सरकारी नोकरांवर हल्ला करणारा दंगेखोर अनिल केवटे तडीपार
By रवींद्र देशमुख | Updated: March 25, 2024 18:20 IST2024-03-25T18:20:22+5:302024-03-25T18:20:31+5:30
या प्रस्तावाच्या अनुषंगाने पोलीस उपायुक्त विजय कबाडे यांनी कार्यवाही करुन अनिल केवटे याला सोलापूर शहर-जिल्ह्यासह धाराशिव जिल्ह्यातून तडीपार करण्याचा आदेश बजावला.

सरकारी नोकरांवर हल्ला करणारा दंगेखोर अनिल केवटे तडीपार
सोलापूर - बेकायदेशीर जमाव जमवून लोकांमध्ये दहशत पसरवून सरकारी नोकरदारांवर हल्ले करणारा दंगेखोर अनिल केवटे (वय- ३२, रा. मंद्रूप, ता. द. सोलापूर) याला सोमवारी सोलापूसह, धाराशिव जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार करण्यात आले. त्याला कर्नाटकातील झडकी येथे सोडण्यात आले.
संबंधित आरोपीविरुद्ध २०२५ ते १०१३ या कालावधीत सर्वसामान्य जनतेला शिवीगाळ करणे, बेकायदेशीर जमाव जमवून दंगा करणे, सरकारी कामकाजात अडथळा निर्माण करुन नोकरदारांवर हल्ला करणे, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणे या सारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याचयाविरुद्ध फौजदार चावडी पोलीस ठाण्याकडून महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ कलम ५६ (१) (अ) (ब) अन्वये तडीपार चा प्रस्ताव पोलीस आयुक्तालयाकडे पाठवला होता.
या प्रस्तावाच्या अनुषंगाने पोलीस उपायुक्त विजय कबाडे यांनी कार्यवाही करुन अनिल केवटे याला सोलापूर शहर-जिल्ह्यासह धाराशिव जिल्ह्यातून तडीपार करण्याचा आदेश बजावला. त्यानुसार त्याला कर्नाटकातील झळकी (ता. इंडी, जि. विजयपूर) येथे सोडण्यात आले.