नगरपरिषद हद्दीतील कराच्या वसुलीची जबाबदारी आता नगराध्यक्ष व मुख्याधिकारी यांच्यावर
By Admin | Updated: March 3, 2017 18:45 IST2017-03-03T18:45:41+5:302017-03-03T18:45:41+5:30
राज्यातील नगरपरिषदा व नगरपंचायती या आर्थिकदृष्ट्या सक्षम बनविण्याच्या उद्देशाने मालमत्ताधारकांकडे असलेल्या मालमत्ता कर व पाणीपट्टीच्या १०० टक्के वसुलीसाठी राज्य शासनानेच

नगरपरिषद हद्दीतील कराच्या वसुलीची जबाबदारी आता नगराध्यक्ष व मुख्याधिकारी यांच्यावर
>आॅनलाइन लोकमत
सोलापूर, दि. ३ - मार्चअखेर सोलापूर शहर ९५ टक्के हागणदारी मुक्त करण्याचा प्रयत्न सुरू असल्याची माहिती आयुक्त विजयकुमार काळम-पाटील यांनी दिली.
स्वच्छ भारत मिशन अंतर्गत शहरात १५ हजार ६00 वैयक्तिक शौचालय बांधण्याचे उद्दिष्ट देण्यात आले होते. त्यापैकी १२ हजार ३00 शौचालयाचे बांधकाम पूर्ण झाले आहे. मार्चअखेर उर्वरित शौचालयांचे बांधकाम पूर्ण करून घेतले जाणार आहे. बांधकाम पूर्ण झालेल्या ११ हजार ६00 शौचालयाचे छायाचित्र स्वच्छ भारत मिशनच्या वेबसाईटवर अपलोड करण्यात आले आहे. उर्वरित कामांची तपासणी करून कामे पूर्ण झालेल्या शौचालयाचे छायाचित्र अपलोड करण्याचे काम प्रगतीपथावर आहे. स्वच्छ भारत मिशन अंतर्गत शौचालय बांधणीच्या कामावर सोलापूर आघाडीवर आहे. ज्या ठिकाणी जागा नाही पण नागरिकांची मागणी असेल तर कमी जागेत प्रिकास्ट शौचालय उभारणीस मंजुरी दिली आहे. अशा शौचालयास ड्रेनेजलाईनला थेट जोडणी देण्याचे सांगण्यात आले आहे.
शहरात उघड्यावर शौचालय करण्याची ठिकाणे निश्चित करण्यात आली होती. यापूर्वी ११५ ठिकाणी सार्वजनिक शौचालये बांधली आहेत.