मांडेगाव येथे आधारकार्ड शिबिराला प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:47 IST2021-02-05T06:47:06+5:302021-02-05T06:47:06+5:30

बार्शी : मांडेगाव ग्रामपंचायत व डाक विभाग बार्शी यांच्या संयुक्त विद्यमाने मांडेगाव येथे आधार कार्ड शिबिराचे आयोजन करण्यात ...

Response to Aadhaar Card Camp at Mandegaon | मांडेगाव येथे आधारकार्ड शिबिराला प्रतिसाद

मांडेगाव येथे आधारकार्ड शिबिराला प्रतिसाद

बार्शी : मांडेगाव ग्रामपंचायत व डाक विभाग बार्शी यांच्या संयुक्त विद्यमाने मांडेगाव येथे आधार कार्ड शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराला सर्वसान्यांचा प्रतिसाद लाभला.

बार्शी तहसीलचे नायब तहसीलदार संजीव मुंढे, डाक विभागाचे उपविभागीय अधिकारी अमित देशमुख, सरपंच पंडित मिरगणे यांची प्रमुख उपस्थिती होती. या शिबिरात नवीन आधारकार्ड काढणे, आधार कार्डमध्ये दुरुस्ती करणे आणि पोस्ट विभागाच्यावतीने जनतेसाठी राबविण्यात येत असलेल्या शासकीय योजनांची माहिती देण्यात आली. पोस्ट विभागाच्या विविध योजनांची माहिती देत आपले गाव सुकन्या ग्राम व डिजिटल इंडिया ग्राम बनविण्यासाठी युवकांनी पुढाकार घेण्याचे आवाहन डाक विभागाचे उपविभागीय अधिकारी अमित देशमुख यांनी केले.

या कार्यक्रमाप्रसंगी प्रणाली प्रबंधक माधव बारस्कर, डाक आवेक्षक अजित नडगिरे, रवींद्र बगाडे, पोस्टमास्तर नागेश कोळी, ब्रँच पोस्ट मास्तर गणेश पवार, पांडुरंग भांगे, उंबर्गे, अंगणवाडी सेविका लता मिरगणे, लक्ष्मी शिंदे, सुनीता मिरगणे, ग्रामपंचायत सदस्य अंबादास काकडे, गोकुळ मिरगणे, तुषार पायघन उपस्थित होते.

---

फोटो : ०२ मांडेगाव

मांडेगाव येथे आधार कार्डला शिबिराला सर्वसामान्यांकडून प्रतिसाद लाभला.

Web Title: Response to Aadhaar Card Camp at Mandegaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.